Ahilyanagar Zilla Parishad: अहिल्यानगरला ३८ महिलांना मिळणार जिल्हा परिषदेत संधी
Local Body Elections: अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७५ गटांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. या वेळी चक्राकार पद्धतीऐवजी लोकसंख्येच्या आधारे आरक्षण ठरवण्यात आले असून, ३८ गट महिलांसाठी राखीव आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे.