Maharashtra Politics: सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. सलग पाच वर्षे सभापती राहिलेले विजय डोंगरे, माजी सदस्य उमेश पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे यांचे गट सर्वसाधारण झाल्याने त्यांना झेडपी रणांगणात पुनरागमनाची संधी मिळणार आहे.