Silk Cocoon Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Cocoon Production: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विक्रमी २४९ टन रेशीम कोष उत्पादन!

Silk Cocoon Market: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादनात मोठी वाढ झाली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात २४९.२८ टन उत्पादन नोंदवले आहे. जिल्ह्यातील १०२० शेतकरी रेशीम उद्योगाशी जोडले गेले असून, तुती लागवड क्षेत्रातही वाढ झाली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते मार्च २५ या आर्थिक वर्षात सुमारे २४९.२८ टन रेशीम कोष उत्पादन झाले. जिल्ह्यात सुमारे १०५० एकर क्षेत्र असून १०२० शेतकरी रेशीम कोष उत्पादन उद्योगाशी जोडले आहेत.

या संदर्भात रेशीम विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या तुतीचे लागवड क्षेत्र १०५० एकर आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत सुमारे ३०० एकर तुती लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात त्यापैकी ७५० शेतकऱ्यांनीच प्रत्यक्ष कोष उत्पादनासाठी काम केले. या रेशीम कोष उत्पादकांनी १०० ते ३०० अंडीपुंजांच्या बॅचमधून रेशीम कोषाचे उत्पादन केले.

वर्षात सरासरी चार ते पाच बॅच शेतकऱ्यांना घेणे शक्य झाले. सुमारे ३ लाख २१ हजार ४०० अंडीपुंजापासून २४९.२८ टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले. उत्पादित रेशीम कोषांना विविध बाजारपेठेतील विक्रीतून सरासरी ५०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यांत रेशीम कोष उत्पादन घेतले जाते.

जालना, बीड, संभाजीनगर, धाराशिवमध्ये रेशीम कोष उत्पादनाची चांगलीच स्पर्धा असते. उत्पादित कोषांवर प्रक्रियेसाठी ऑटोमॅटिक रिलिंग युनिटची संख्याही वाढते आहे. नुकतेच महात्मा गांधी मिशनला छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटोमॅटिक रिलिंग मशीन मंजूर झाले आहे. या रिलिंग युनिटच्या माध्यमातून ३०० किलो कोषांवर प्रक्रिया करणे शक्य होईल.

१ कोटी ८३ लाख अनुदान

तुती लागवड, ठिबक, कीटक संगोपन गृह, रिलिंग मशिन आदींसाठी प्रलंबित अनुदानापैकी सुमारे १ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. फक्त अनुदान गतीने लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिल्क समग्रच्या माध्यमातून दाखल प्रस्तावांपैकी सुमारे ७० प्रस्ताव अनुदानासाठी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे यांनी दिली.

नॉन स्पिनिंगसह इतर संकटांचा सामना रेशीम कोष उत्पादकांना करावा लागत आहे. त्यातून मार्ग काढत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी १० ते १५ टक्क्यांपर्यंत रेशीम कोषांचे उत्पादन वाढविले आहे. दरही बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हातभार लागला आहे.
बी. डी. डेंगळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT