संजीव चांदोरकरDemocratic Victory: अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक उमेदवार निर्णायक मताधिक्याने विजयी झाले. पण इतर सर्व उमेदवारांच्या तुलनेत जगभर चर्चा कोणाची होत असेल, तर न्यू यॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेल्या जोहरान ममदानी यांची. हे खूप आश्वासक आहे. त्यांचे अभिनंदन! .या निवडणुकीच्या जोडीला न्यू जर्सी, वर्जिनिया येथे देखील गव्हर्नर पदाच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या महिला उमेदवार पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. या निवडणुकांकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गेल्या दहा महिन्यांतील राज्यकारभारावरील मध्यावधी मतदान म्हणून बघितले जात आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प चक्क नापास झाले आहेत..डोनाल्ड ट्रम्प दुय्यम आहेत. ट्रम्प यांना सर्वाधिकार देणाऱ्या मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA) राजकीय तत्त्वज्ञानाला देखील अमेरिकन मतदार नागरिकांनी स्पष्ट नकार दिला आहे. देश एकवंशीय असणार की बहुवंशीय या प्रश्नाचे निःसंदिग्ध उत्तर बहुवंशीय हे असेल ! ट्रम्प यांच्या disapproval पेक्षा हे दुसरे अधिक महत्त्वाचे आहे..या निवडणुकांतील काही निरीक्षणे पुढीलप्रमाणेसर्व ठिकाणचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार निर्णायक मताधिक्याने निवडून आले आहेत. कुठेही संदिग्धता नाही.संसदीय निवडणुकांचा वापर करत हुकूमशहा सत्तेवर येतात हे वारंवार सांगितले जाते. पण त्याच संसदीय निवडणुकांमध्ये हुकूमशाहांना खाली खेचण्याची देखील ताकद आहे, हे परत परत स्वतःलाच सांगावयास हवे..Local Body Election: राज्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचे बिगूल.ममदानी यांनी संपूर्ण प्रचारात निःसंदिग्धपणे पर्यायी समाजवादी मांडणी केली; जी जगातील भारतासकट अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना लागू पडते. या मांडणीतून गेली जवळपास ४० वर्षे ब्रेनवॉश केल्या गेलेल्या कॉर्पोरेट वित्त भांडवल धार्जिण्या आर्थिक तत्त्वज्ञानाला भविष्यात आव्हान मिळू शकते. म्हणून ममदानी जगभर दखलपात्र झाले आहेत..ममदानी यांनी बोजड वैचारिक मांडणी न करता ठोस राजकीय आर्थिक कार्यक्रम मतदारांसमोर ठेवला. फाफटपसारा न करणारी स्पष्ट मांडणी मतदार नागरिकांच्या मनाचा ठाव घेऊ शकते. आरोग्यसेवा, नागरी वाहतूक, घरांच्या किमती आणि भाडे, शिक्षण, रोजगार, वेतनमान... या आधुनिक औद्योगिक मानवी समाजाच्या शेकडो वर्षे जुन्या पायाभूत गरजा आहेत. बाकी सारे नंतर येते..Maharashtra Local Body Elections: अहिल्यानगरला ११ नगर परिषदा, एका नगरपंचायतीसाठी निवडणूक, राजकीय पक्ष, नेते लागले कामाला .ममदानी यांनी परवडणाऱ्या किमती (Affordability) हा शब्द अजेंड्यावर आणला आहे. सर्व वस्तुमाल / सेवांच्या किमती बाजार ठरवेल, या नव उदारमतवादी तत्त्वाला परवडणाऱ्या किमतींचे तत्त्व छेद देते. हा खूप मोठा मेसेज आहे.प्रस्थापित व्यवस्था, प्रस्थापित राज्यकर्ते यांच्या विरुद्ध खूप असंतोष आहे म्हणून सत्ता बदल होणार नाही. त्यासाठी संघटना, पक्ष यांचे प्लॅटफॉर्म लागतात. तो असंतोष संघटित करण्यासाठी कार्यक्रम आणि पक्ष, संघटनाचे विश्वासार्ह प्लॅटफॉर्म लागतात..जीवन-मरणाच्या राजकीय संघर्षात दरवेळी नवीन राजकीय प्लॅटफॉर्म तयार करायची गरज नसते. अस्तित्वात असलेले राजकीय प्लॅटफॉर्म वापरावे लागतात. एक तातडी असते. इतिहासात डोकावले तर हे दिसेल की डेमोक्रॅटिक पक्षाच्या अमेरिकन प्रस्थापित वर्ग धार्जिण्या भूमिका काही कमी निंदनीय नाहीत. (अब्जाधीश अँड्र्यू क्युमो यांनी आपली हयात डेमोक्रॅटिक पक्षात घालवली आहे). पण मतदार नागरिक राजकीय दृष्ट्या खूप प्रगल्भ असतात..शेवटी तरुण पिढीबद्दल. ‘जनरेशन झेड (जेन झी)’ची चर्चा आशियायी राष्ट्रामध्ये बरीच झाली. पण नव उदारमतवाद पुरस्कृत जागतिकीकरणानंतर जन्माला आलेली ही पिढी प्रत्येक देशात आहे. ती तंत्रसेन्ही (टेक सॅव्ही) आहे. तिला स्वप्ने, आकांक्षा आहेत. तिला राजकीय परिभाषा कमी अवगत असेल कदाचित पण तिचे सामाजिक, राजकीय, आर्थिक भान तसूभरही कमी नाही. आमची पिढी निसर्गनियमानुसार काळाच्या पडद्याआड जाणार. पण हे शतक या पिढीचे आहे. ती तिच्या पद्धतीने एक एक प्रश्न हाताळणार याबद्दलचा विश्वास बळकट झाला.हे सारे अमेरिकेबद्दल आहे हे खरे. पण अजूनही अमेरिका जगासाठी ट्रेंड सेटर आहे. अगदी आपल्या भारतासाठी देखील.(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.