भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे झाले कठीणशेतकऱ्याने हताश होऊन त्याच्या कांदा पिकावर फिरवला ट्रॅक्टर .Onion Price Crash: भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याचे दर इतके घसरले आहेत की शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. यामुळे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बंबोरा गावातील एका शेतकऱ्याने हताश होऊन त्याच्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला..अलवर ही नाशिकनंतरची देशातील सर्वात दुसरी मोठी कांद्याची बाजारपेठ मानली जाते. येथून देशातील अनेक राज्यांत आणि परदेशात कांदा पाठवला जातो. अलिकडील काही वर्षांत कांद्याला चांगला भाव मिळाला. यामुळे शेतकरी पारंपारिक पिकांपेक्षा कांदा पीक लागवडीकडे वळले. पण, यावर्षी भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. .Onion Subsidy: फेरछाननीनंतर पात्र कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षाच.बाजार समितीत कांदा प्रति किलो २ ते ६ रुपयाला विकला जात आहे. वाहतूक आणि मजुरी खर्च हा कांदा विकून मिळालेल्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे. अशा परिस्थितीत कांदा बाजार समितीत घेऊन जाणे तोट्याचे ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Onion Prices: राजस्थानात कांद्याचे भाव ५० टक्क्यांनी घसरले, शेतकऱ्यांनी ४ ट्रॉली कांदा नदीत फेकला.बंबोरा गावातील एका शेतकऱ्याने १.५ बिघा जमिनीतील (एक बिघा जमीन म्हणजे ०.६२५ एकर) उभ्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला. इतक्या कमी भावात कांदा विकण्यात काही अर्थ नव्हता. मजूर, वाहतूक आणि पीक काढणीसाठी १५ हजार ते २० हजार रुपये खर्च येतो, तर बाजारभाव इतका कमी आहे की संपूर्ण पीक विकूनही खर्च भरून निघत नाही, असे सदर शेतकऱ्याने म्हटले आहे. आता, शेतकरी रब्बी हंगामातील गहू पेरण्याची तयारी करत आहेत. .उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात मोठी तफावत एक बिघा जमिनीत कांदा पीक लागवडीसाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगतात.यात बियाणे, खते, मशागत, सिंचन, कीडनाशके आणि मजूर यांचा समावेश आहे.पण सध्या ४० किलो कांद्याचे पोते केवळ १०० ते १५० रुपयांना विकले जात आहे.अशा परिस्थितीत, शेतकरी आपला खर्चही भरून काढू शकत नाही. तसेच बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भाव आणखी खाली येण्याचा धोका आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.