Beed Silk Cocoon Market: बीडची बाजारपेठ रेशीम कोष खरेदीचे हब ;१०० कोटींची उलाढाल ओलांडली!

Beed Market Update: बीड कृषी उत्पन्न बाजार समितीतील रेशीम कोष खरेदी बाजारपेठ संपूर्ण मराठवाड्यातील एक प्रमुख केंद्र बनत आहे. २०२१ पासून सुरू झालेल्या या बाजारपेठेत आतापर्यंत १०० कोटींहून अधिक उलाढाल झाली असून, राज्यासह कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूतील व्यापारी येथे मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.
Beed Market
Beed MarketAgrowon
Published on
Updated on

Beed News: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख्य यार्डात सुमारे चार वर्षांपूर्वी सुरू झालेली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ मराठवाड्यातील कोष खरेदीचे केंद्र बनू पाहत आहे. विविध भागांतून या बाजारपेठेत रेशीम कोष विक्रीसाठी आणण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रेशीम कोष खरेदी सुरू झाल्यापासून सोमवारपर्यंत (ता. १७) या बाजारपेठेतील उलाढाल सुमारे १०० कोटींवर पोहोचली आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डात वस्त्रोद्योग संचालनालयाच्या मान्यतेने स्व. विनयकराव मेटे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ ६ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आली. बाजार समितीच्या माहितीनुसार, तेव्हापासून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत या बाजारपेठेत राज्याच्या विविध भागांतील २४ हजार ६६० शेतकऱ्यांनी सुमारे २६ लाख ३९ हजार ९९४ किलो ८६ ग्रॅम रेशीम कोष विक्रीसाठी आणला होता.

Beed Market
Silk Cocoon : बीडच्या बाजारपेठेत होते राज्यातून रेशीम कोषांची आवक

मिळालेल्या कमी-अधिक दरानुसार या कोष खरेदीतून सुमारे ९० कोटी ५५ लाख २३ हजार ७९७ रुपयांची उलाढाल झाली. १ जानेवारीपासून सोमवारपर्यंत (ता. १७) सुमारे २२२५ शेतकऱ्यांनी १ लाख ९७ हजार ५१४ किलो ४५० ग्रॅम रेशीम कोष विक्रीसाठी आणले. मिळालेल्या कमी-अधिक दरानुसार ज्याची खरेदी किमतीप्रमाने उलाढाल सुमारे ११ कोटी १७ लाख ४३ हजार ४५० रुपये झाली.

जानेवारीपासून सोमवारपर्यंत आवक झालेल्या रेशीम कोषांना कमीत कमी १५० व जास्तीत जास्त ७९५ रुपये तर सरासरी ५६६ रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळाला. राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी आपला रेशीम कोष विक्रीसाठी या बाजारपेठेत घेऊन येत असतानाच कर्नाटकातील रामनगर, पश्चिम बंगाल, बेंगलोर, भंडारा, सांगली, लातूर, जालना, हिंदपूर, चिक बाळापूर, सिद्धलगट्टा, तमिळनाडू, कनकापूर, बेळगाव, हुबडी, गुलबर्गा, हैदराबाद, विजयवाडा यासह स्थानिक व्यापारी खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत भाग घेत असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

Beed Market
Silk Cocoon Production : आरक्षणासाठी बीड बंद! बाजार समितीही बंद असल्याने १० ते १२ टन रेशीम कोष शेतावरच अडकला
सध्या पोषक वातावरण असल्यामुळे चांगल्या प्रतीचे व जास्त प्रमाणात कोष येत आहेत, त्यामुळे चांगले दर मिळत आहेत. शेतकऱ्यांसाठी सुविधांच्या दृष्टीने शेतकरी निवास बांधण्याचा विचार आहे. शेतकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात याकडे बाजार समिती लक्ष देईल. शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय, वेळेवर पैसे दिले गेले पाहिजेत, शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊन देणार नाही.
बाळासाहेब भाऊसाहेब जाधव, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड

वर्षनिहाय कोष आवक (किलोमध्ये) व एकूण खरेदी किंमत

वर्ष.... शेतकरी..... कोष आवक ..... खरेदी किंमत

२०२१-२२... १,१८७.... ७,०९,३५६.३३०....६,५३,१०,९४६.७०

२०२२-२३... ४,८५०....४,४७,७३३.२८०....२५,३५,७०,८१६.२७

२०२३-२४....७३४०....१३,२८,९७१.५५०...५०,१२,४८,०४४.०३

डिसेंबर २०२४ पर्यंत..११,२८३..१,५३,९३३.७००... ८,५३,९३,९९०

जानेवारी ते१७ फेब्रूवारी २०२५..२,२२५..१,९७,५१४.४५०...११,१७,४३,४५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com