Turmeric Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : हिंगोलीत हळदीला ११००० ते १४५०० रुपयांचा दर

Turmeric Market Update : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ३१) हळदीची आवक २५०० क्विंटल होती.

Team Agrowon

Hingloli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ३१) हळदीची आवक २५०० क्विंटल होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान ११००० ते कमाल १४५०० रुपये तर सरासरी १२७५० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गेल्या आठवभरात हिंगोली मार्केटमधील हळदीचे दर क्विंटलमागे १००० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे आवक कमी झाली आहे. मागील काही दिवसांत हळदीच्या दरात सुधारणा होऊन दर १५ हजार रुपयांवर पोहोचले होते.

त्या वेळी दररोज ३००० ते ४००० क्विंटलवर हळदीची आवक होती. मागील गुरुवारपासून (ता. २४) किमान व कमाल दरात घसरण झाली आहे. आवकदेखील निम्म्यावर आली आहे.

शनिवारी (ता. २६) हळदीची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १३९०० ते कमाल १५००० रुपये तर सरासरी १४५५० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. २५) हळदीची १८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १४८०० ते कमाल १६५०० रुपये तर सरासरी १५६५० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २४) हळदीची १५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल कमाल दर १४१०० ते १५५०० रुपये तर सरासरी १४८०० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: शेतकऱ्यांना ६४८ कोटी रुपये मिळणार; २३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर 

Cooperative Bank: जिल्हा बँकेच्या ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम’ सेवेला सुरुवात

Monsoon Rain Update: ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

Dry Fruits: दिवाळीत सुकामेव्याचे दर गगनाला, खोबरे दर दुप्पट

Crop Insurance: नुकसानग्रस्तांना विम्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT