Turmeric Cultivation : पावसाच्या खंडामुळे हळदीची वाढ खुंटली

Spice Crops : सध्या उन्ह आणि ढगाळ वातावरणाचा हळदीच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावले असल्याचे चित्र आहे.
Turmeric Crop
Turmeric Crop Agrowon

Turmeric Crop Cultivation : गेल्या चार ते पाच वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर मिळाले नाहीत. लांबणीवर पडलेला पाऊस या साऱ्याचा फटका हळद लागवडीला बसला आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने हळदीची वाढ खुंटली आहे.

देशात हळदीची २ लाख २ हजार ११२ हेक्टरवर लागवड झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या क्षेत्रात ३० टक्के घट झाल्याचा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. सध्या उन्ह आणि ढगाळ वातावरणाचा हळदीच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावले असल्याचे चित्र आहे.

Turmeric Crop
Turmeric Market: हळद लागवड यंदा कमी राहण्याचा अंदाज |Agrowon| ॲग्रोवन

देशात गेल्यावर्षी ३ लाख २३ हजार ८३८ हेक्टरवर हळद होती. हळद लागवडीचा कालावधी १५ एप्रिलपासून मे अखेर असा असतो. परंतु यंदा देशातील हळदीचे उत्पादन घेणाऱ्या राज्यात पावसाच्या दडीमुळे हळद लागवड लांबणीवर पडली होती.

त्यातच ज्या भागात शाश्वत पाण्याची सोय होती, अशा ठिकाणी एप्रिलनंतर शेतकऱ्यांनी लागवड करण्यास पुढाकार घेतला. मात्र, पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेतकरी हळद लागवडीसाठी पावसाची प्रतीक्षा करत होता. यावर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून हळद लागवड सुरू झाली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागवड केली जात होती. अर्थात यंदाच्या हंगामात सुमारे २० ते २५ दिवस हळद लागवडीचा हंगाम लाबंणीवर पडला होता.

Turmeric Crop
Turmeric Crop : हळद पिकांच्या नियोजनामुळे वाढले उत्पन्न

दरम्यान, गेल्या चार ते पाच वर्षांपासून हळदीच्या क्षेत्रात वाढ होत असून हळदीचे उत्पादनही वाढल्याचे चित्र होते. परिणामी हळदीला अपेक्षित दर मिळाले नाहीत. त्यामुळे हळदीच्या लागवडीपेक्षा उत्पादन खर्च वाढल्याने मिळणाऱ्या पैशांचा ताळमेळ कसा करायचा, असा प्रश्न हळद उत्पादकांना पडला होता.

त्यातच यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल कमी झाला. देशात यंदाच्या हंगामात २ लाख २ हजार १२२ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली.

तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांसह इतर राज्यांत सुमारे २५ ते ३२ टक्क्यांपर्यंत हळदीच्या क्षेत्रात घट झाली आहे. अर्थात देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी क्षेत्रात घट झाली असल्याचे हळद संशोधन केंद्राने सांगितले.

Turmeric Crop
Turmeric Market: हळद बाजारातील तेजी पुढील काळातही टिकेल का? | Agrowon| ॲग्रोवन

हळद लागवड करून सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने हळद पिकाची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे ऐन वाढीच्या काळात पावसाने दडी मारली. याचा परिणाम हळद वाढीवर होऊ लागल्याने हळदीची वाढ खुंटली आहे.

शाश्वत असणारे पाणीही कमी होऊ लागल्याने हळद पिकाला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे हळद उत्पादकांवर संकट ओढावले आहे.

यंदा हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात पुरेसा पाऊस नाही. तसेच गेल्या चार वर्षांत हळदीला चांगले दर नाहीत. त्याचा फटका हळद लागवडीवर झाला आहे. यामुळे देशातील हळदीचे क्षेत्र सुमारे ३० टक्क्यांनी घटले असल्याचे चित्र आहे.
डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज
यंदाच पर्जन्यमान कमी असूनही तापमान वाढू लागले आहे. जमिनीची धूप होऊ लागली आहे. त्याचा परिणाम हळद पिकाच्या वाढीवर होत आहे.
राजेंद्र मिणचे, हळद उत्पादक शेतकरी, कसबे डिग्रज, जि. सांगली.

देशातील हळद क्षेत्र दृष्टीक्षेप

वर्ष.... क्षेत्र (हेक्टरमध्ये)

२०१८-१९...२,६१,९२२

२०१९-२०...२,९६,१८१

२०२०-२१...२,९२,७५३

२०२१-२२...३,३३,०२४

२०२२-२३...३,२३,८३८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com