India Allows 5 Lakh Metric Tonnes Wheat Flour Export: देशातील गहू उत्पादनात सुधारणा झाल्याने केंद्र सरकारने निर्यातीचा मार्ग खुला केला आहे. सरकारने शुक्रवारी ५ लाख मेट्रिक टन गहू पीठ आणि त्यापासून बनवण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीस परवानगी दिली. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादनात घट झाल्याने देशांतर्गत भाव विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर मे २०२२ मध्ये सरकारने गव्हाच्या पीठ निर्यातीवर बंदी घातली होती..तीन वर्षांहून अधिक कालावधीच्या निर्बंधांनंतर गहू उत्पादनांच्या मर्यादित निर्यातीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. देशात गव्हाचा पुरेसा बफर साठा आहे. तसेच महागाईचा दर ०.३ टक्क्यांच्या विक्रमी निचांकी पातळीवर आहे. यामुळे निर्यात खुली करण्यात आली आहे..सुधारित धोरणानुसार, गहू पीठ, आटा, मैदा, रवा, सुजी, होलमील आटा यासह ५ लाख टनांपर्यंत एकत्रित प्रमाणात निर्यातीस परवानगी दिली जाईल. ही निर्यात परकीय व्यापार महासंचालनालयाकडून (DGFT) दिल्या जाणाऱ्या निर्यात परवान्यांअंतर्गत, स्वतंत्रपणे अधिसूचित अटी आणि प्रक्रियांनुसार होईल. मात्र, तरीही ही उत्पादने ‘मर्यादित’ श्रेणीतच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या उत्पादनांना अमेरिका, ब्रिटन, आखाती देश, आफ्रिका आणि आग्नेय आशियाच्या काही भागांतून मोठी मागणी आहे. या ठिकाणी भारतीयांची संख्या अधिक आहे. .Wheat Production: यंदा विक्रमी गहू उत्पादन; पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढणार: कृषिमंत्री चौहान.डीजीएफटीने शुक्रवारी निर्यात धोरण शिथील करत दिलेल्या सवलतीबाबत अधिसूचना जारी केली. त्यानंतर पात्रता, अर्ज आणि वाटपाची पद्धती यासंदर्भात सविस्तर सार्वजनिक सूचना जाहीर केली. डीजीएफटीच्या आदेशानुसार, निर्यातीसाठी अर्ज त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. त्यासाठी २१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान मुदत आहे. त्यानंतर, परवानगी असलेल्या निर्यात मर्यादेचे प्रमाण संपेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या १० दिवसांत अर्ज मागवण्यात येतील..Wheat Sowing: गुजरातमध्ये रब्बीत गव्हाचा सर्वाधिक पेरा.निर्यातदारांना त्यांच्याकडील उत्पादन क्षमता, आधीची निर्यातीची कामगिरी, निर्यात ऑर्डरची पुष्टी, पुरवठा वेळापत्रक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून गहू मिळवला गेला नसल्याचे प्रमाणित स्वयं-घोषणापत्र यासह सविस्तर कागदपत्रे सादर करावी लागतील, असे त्यात नमूद केले आहे..नोव्हेंबर २०२५ मध्ये जाहीर केलेल्या २०२४-२५ च्या पीक उत्पादनाच्या अंतिम अंदाजानुसार, देशात गव्हाचे उत्पादन १,१७९ टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन मागील वर्षीच्या १,१३२ टनांच्या तुलनेत अधिक असेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.