Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : नगर जिल्ह्यात कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपर्यंत दर

Onion Rate : नगर जिल्ह्यात कांद्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. ७) झालेल्या लिलावात कांद्याला ३०० रुपयांपापासून २८०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात कांद्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. ७) झालेल्या लिलावात कांद्याला ३०० रुपयांपापासून २८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांदा दरवाढीची शेतकऱ्यांना आशा असताना दरात फारशी दरात वाढ होताना दिसत नाही.

नगर जिल्ह्यात खरिपासह रब्बीतही कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा पावसाच्या तुटीमुळे कांद्याचे लागवड क्षेत्र कमी होऊन जिल्ह्यात सोळा हजार हेक्टरवर कांद्याची रब्बीत लागवड झाली. उन्हाळ्यातही काही प्रमाणात लागवड कमी होण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी मात्र उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. मात्र त्यानंतर कांद्याला पुरेसा दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला नाही. यंदा अतिवृष्टी, गारपिटीने कांदा भिजला, त्यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत दोन महिने टिकवण क्षमता कमी झाली.

नगर येथील बाजार समितीसह जिल्हाभरात दर लिलावाला सुमारे दोन लाख गोण्यापर्यंत आवक होत असते. गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दर वाढण्याची लोकांना आशा आहे. मात्र फारशी कांदा दरवाढ होताना दिसत नाही. शनिवारी नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावाला ८६ हजार ४७२ गोण्यांची आवक झाली.

लिलावात एक नंबरच्या कांद्याला २१५० ते २८०० रुपये, दोन नंबरच्या कांद्याला १४५० ते २१५०, तीन नंबरच्या कांद्याला ९०० ते १४०० रुपये तर चार नंबरच्या कांद्याला ३०० ते ९०० रुपयांचा दर मिळाला. सरासरी २ हजारांचा दर मिळाला. पारनेर, घोडेगाव, राहुरी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर बाजार समित्यांतही असाच दर आहे. मात्र नगर, घोडेगाव वगळता अन्य ठिकाणी फारसा दर नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT