Onion Market : चाळीसगाव, जळगावात कांदा आवक वाढली

Onion Rate : खानदेशात कांद्याची आवक वाढत असून, चाळीसगाव येथील बाजारात मागील पाच ते सहा दिवसांत प्रतिदिन सरासरी १५०० क्विंटल आवक झाली.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात कांद्याची आवक वाढत असून, चाळीसगाव येथील बाजारात मागील पाच ते सहा दिवसांत प्रतिदिन सरासरी १५०० क्विंटल आवक झाली. जळगाव येथील बाजारातही प्रतिदिन सरासरी ६०० क्विंटल आवक आठवड्यात झाली असून, दर कमाल २३०० व सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत.

चाळीसगाव बाजार समितीत दोन ते तीन दिवसांत किमान ५००, कमाल २१०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जळगाव येथील बाजार समितीत मात्र किमान १०००, कमाल २२०० व सरासरी १९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. चाळीसगाव येथे लिलाव सुरळीत सुरू आहेत.

Onion Market
Onion Market : पवार समितीच्या कांदा खरेदीच्या शिफारशी बासनात

जळगाव व चोपडा तालुक्यांतील अडावद येथेही लिलाव सुरळीत होत आहेत. यामुळे आवक कायम असून, दरही टिकून आहेत. खानदेशात मध्यंतरी आवक घटली होती. एकूण आवक १५०० ते १६०० क्विंटल, एवढी प्रमुख बाजार समित्यांत मिळून होत होती. परंतु मागील आठवड्यात आवकेत वाढ झाली. साठवून ठेवलेला कांदा सध्या बाजारात येत आहे. दरही टिकून असल्याने आवक वाढल्याची माहिती मिळाली.

जळगाव बाजार समितीत चाळीसगाव बाजार समितीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी आहे. परंतु या बाजारातील आवक मागील महिन्याच्या तुलनेत काहीशी वाढली आहे, अशी माहिती मिळाली. जळगावात रोज सकाळी लिलाव उरकले जात आहेत. आवक छत्रपती संभाजीनगर, धुळ्यातील साक्री, धुळे, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा आदी भागांतून होत आहे, असे सांगण्यात आले.

Onion Market
Onion Market : व्यापाऱ्यांवर कारवाई का नाही?

नवीन हंगामातील कांद्याची आवक नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होईल. कांद्याच्या दरात मागील महिन्यात सुधारणा सुरू झाली. सुधारणा सुरूच असून, दरही टिकून आहेत. सुरुवातीला दर कमाल १५०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल होते. परंतु सात ते आठ दिवसांत चाळीसगाव, जळगावात कमाल दरपातळी २००० हजार रुपयांवर पोहोचली.

चाळीसगावात खुल्या कांद्याची आवक

चाळीसगाव येथे वाहनात भरून खुल्या स्वरूपातील किंवा गोण्यांमध्ये न भरता कांदा आणला जात आहे. यात शेतकऱ्यांचा गोण्या व इतर खर्च वाचत असल्याने खानदेशात सर्वाधिक आवक चाळीसगाव येथील बाजारात होत आहे.

\सोमवारी (ता. २) चाळीसगाव बाजार समितीत कांद्याची विक्रमी अडीच हजार क्विंटल आवक नोंदविण्यात आली. चाळीसगाव येथे छत्रपती संभाजीनगर, धुळे जिल्ह्यातूनही आवक होत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पारोळा भागातूनही कांद्याची पाठणूक चाळीसगाव येथे होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com