Raisin Rate | Raisin Prices Sustained Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Rate : बेदाण्याचे दर टिकून

सध्या देशभरातील बाजारपेठेत बेदाण्याला अपेक्षित अशी मागणी आहे. त्यामुळे बेदाण्याला चांगला उठावही आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः सांगली आणि तासगाव या दोन्ही बाजार (Sangli APMC) समित्यांत सुमारे १५०० टन बेदाण्याची विक्री (Raisin Sale) होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर (Raisin Rate) टिकून असून, सध्या बेदाण्याला प्रति किलो ७० ते २३० रुपये असा दर आहे.

हंगामातील नवीन बेदाणा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात येईल, अशी शक्यता बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली.

सध्या देशभरातील बाजारपेठेत बेदाण्याला अपेक्षित अशी मागणी आहे. त्यामुळे बेदाण्याला चांगला उठावही आहे. तासगाव बाजार समितीत अंदाजे एक हजार टन तर सांगली बाजार समितीत ५०० टनांपर्यंत बेदाण्याची आवक होत असून, तेवढाच बेदाणा विकला जात आहे. त्यामुळे गतवर्षीच्या हंगामातील बेदाणा नवीन हंगाम सुरू होईपर्यंत पुरवठा होईल, अशी माहिती बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली.

दिवाळीनंतर सुरू झालेल्या बेदाण्याच्या सौद्यामध्ये बेदाण्याची आवक कमी अधिक होत आहे. दरम्यान, बेदाण्याचे दर प्रति किलो ७० ते २३० रुपयांपर्यंत होते. दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. सध्या बाजारपेठेतील बेदाण्याची मागणी लक्षात घेता दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला.

बेदाणा शेडची दुरुस्ती सुरू

बेदाणा निर्मितीसाठी परराज्यांतील मजूर बेदाणा शेडवर दाखल झाले आहेत. यंदाच्या हंगामातील बेदाणा शेडची दुरुस्ती सुरू झाली आहे. बेदाणानिर्मिती जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

प्रतवारीनुसार बेदाणा दर..प्रति किलो

एक नंबर प्रत ः १५० ते २३०

दोन नंबर प्रत ः १२० ते १५०

तीन नंबर प्रत ः ३० ते ७०

गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. सांगली आणि तासगाव बाजार समित्यांत सुमारे दीड हजार टन आवक आणि विक्री होत आहे. नवीन बेदाणा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.

- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT