Team Agrowon
पावसाने उघडीप दिल्यानंतर फळ छाटणी सुरू झाली. मात्र, ऑक्टोबरमध्येही पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळ छाटणी थांबवली.
जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरासह मिरज तालुक्याचा पूर्व भाग, जत तालुक्याच्या पूर्व भागासह अन्य भागात बेदाणा तयार केला जातो.
दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून बेदाणा निर्मिती सुरू होते. परंतु यंदा द्राक्ष हंगाम धरण्याच्या वेळीच पावसाने हजेरी लावली असल्याने फळ छाटणी मागे पुढे झाली आहे.
सध्या बेदाणा शेडची दुरुस्ती करण्याचे नियोजन शेड मालक करत असून मजूरही लवकर दाखल होणार आहेत.
बेदाण्यासाठी जे वाण आहेत, त्या वाणापासून बेदाण्याची निर्मिती फेब्रुवारीपासून सुरू होईल.
यंदा द्राक्षाला पोषक असे वातावरण असल्याने दर्जेदार द्राक्ष तयार होतील. त्याचबरोबर दर्जेदार बेदाणाही तयार होईल, अशी आशा आहे.