Raisin trade and market rates in India Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Price: बेदाणा दर टिकून; मागणी कमी

Raisin Market Update: देशांतर्गत बाजारपेठेत बेदाण्याची मागणी काहीशी मंदावली असली तरी दर टिकून आहेत. दर्जानुसार बेदाण्याला २५० ते ३७० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Indian raisin trade and Market: देशांतर्गत बाजारपेठेत बेदाण्याची मागणी काहीशी मंदावली असली तरी दर टिकून आहेत. दर्जानुसार बेदाण्याला २५० ते ३७० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. आतापर्यंत १ लाख २० हजार ते १ लाख ४० हजार टनांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. आता दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढून दर सुधारतील, अशी बेदाणा उत्पादकांना अपेक्षा आहे.

राज्यात गतहंगामात सुमारे १ लाख ८० हजार ते २ लाख टन बेदाण्याचे उत्पादन झाले. एप्रिल महिन्यात बेदाण्याच्या दर्जानुसार दर २५० ते ४०० रुपये प्रति किलो होता. मे ते जुलै या दरम्यान बेदाण्याचे दर टिकून होते. गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याच्या दरात फारशी चढ-उतार झाली नाही.

साधारणपणे जुलैनंतर बेदाण्याला चांगला उठाव मिळतो. मागणी वाढल्याने या कालावधीत दरातही सुधारणा होते. यंदा या कालावधीत मागणी अपेक्षेइतकी वाढली नाही. गणेशोत्सवाच्या काळातही बाजारात उठाव मर्यादित राहिल्याने बेदाण्याच्या दरात मोठी तेजी-मंदी झाली नाही.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दर तुलनेने स्थिर आहेत. सद्यःस्थितीला शेतकऱ्यांकडे ५० ते ६० हजार टन इतका बेदाणा शिल्लक आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे उत्पादकांनी विक्रीचे नियोजन या कालावधीसाठी केले आहे. येत्या पंधरवड्यात मागणीत वाढ होण्याची शक्यता बेदाणा उद्योगातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे दसरा-दिवाळी या सणाकडे लक्ष लागले आहे.

सद्यःस्थितीत बाजारात बेदाण्याच्यी फारशी मागणी आणि उठाव नाही. परंतु येत्या पंधरवड्यात बेदाण्याची मागणीही वाढेल, आणि दरही वाढतील, अशी आशा आहे.
अनंत कबाडे, बेदाणा उत्पादक शेतकरी
मागणी काहीशी कमी असल्याने उठाव मंदावला आहे. मात्र आवक आणि मागणीतील स्थिती पाहता बेदाण्याचे दर टिकून आहेत.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Declaration : दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढण्याची शक्यता

Maharashtra Drought 2026: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ

Agrowon Sarpanch Mahaparishad: कोल्हापुरात आज विभागीय ‘ॲग्रोवन सरपंच महापरिषद’

Sugar Prices Issue: साखरेच्या दराबाबत सरकार गंभीर नाही: आमदार जयंत पाटील

Maharashtra Rain Prediction: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT