Cattle Fodder: मजुरांकडून ऊस तोडणी केल्यास जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचे वाडे उपलब्ध होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात हार्वेस्टरच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र हा निर्णय एकतर्फी असल्याची भावना हार्वेस्टर मालकांनी व्यक्त केली आहे. .हार्वेस्टर खरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय उभारलेल्या तरुण व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणींचा विचार या निर्णयात झाला नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे आता ‘हार्वेस्टरवरील बंदी उठवा किंवा आमची कर्जे माफ करा,’ अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे..Sugarcane Harvester Machine Ban: सोलापुरात ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर मशीन वापरण्यास मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे साखर कारखान्यांना निर्देश.सोलापूर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी साधारणतः १०० हून अधिक हार्वेस्टर कार्यरत आहेत. राज्यात ही संख्या जवळपास एक हजाराच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. या व्यवसायात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. .अनेक तरुणांनी बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन हार्वेस्टर खरेदी केले आहेत. ऊस तोडणीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाचे हप्ते फेडण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, बंदीच्या निर्णयामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ऊस तोडणी यंत्रणा, शेतकरी, मजूर आणि हार्वेस्टर व्यावसायिक या सर्वांचा विचार करून निर्णय घेण्याची गरज असल्याचे हार्वेस्टर मालकांचे म्हणणे आहे..Sugarcane Harvester: उसाच्या फडात हार्वेस्टरचा वाढला दबदबा.चाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा; पण व्यावसायिकांचे काय?चाऱ्याची गरज आणि शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असले, तरी त्यासाठी हार्वेस्टर व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. एक हार्वेस्टर आणि त्यासोबतच्या अन्य अवजारांसाठी साधारणतः एक ते दीड कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांची खरेदी करताना बँकांकडून कोट्यवधी रुपयांची कर्जे घ्यावी लागली आहेत. त्यासाठी वर्षाला ठरावीक हप्ते भरावे लागतात. ऊस तोडणीचा हंगाम हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. अशा काळात हार्वेस्टरचा वापर बंद झाल्यास उत्पन्न मिळणार कुठून आणि बँकेचे हप्ते भरायचे कसे? हार्वेस्टर खरेदी करताना घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज, देखभाल आणि अन्य खर्च यांचा भार कायम राहणार आहे. तो आम्ही कसा सोसायचा, असा प्रश्न या व्यावसायिकांनी विचारला आहे..हार्वेस्टर खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. अनेक तरुणांनी रोजगार आणि व्यवसायाच्या उद्देशाने या क्षेत्रात पाऊल ठेवले. प्रशासनाच्या निर्णयामुळे व्यवसाय ठप्प होणार असेल, तर त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? बंदी कायम ठेवायची असल्यास आम्हाला कर्जमाफी द्या. लवकरच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहोत.- मळसिद्ध गाडेकर, हार्वेस्टर मालक, भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.