Sangli Farmer Protest Update: चीनमधून होणारी द्राक्षांची आयात, अफगाणिस्तानातून बेकायदेशीर मार्गाने येणारा बेदाणा आणि परदेशातून आयात होणाऱ्या कृत्रिम फुलांमुळे देशातील द्राक्ष व फूल उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या आयातीवर कठोर निर्बंध घालून आयात शुल्क वाढवावे, अन्यथा दिल्लीतील जंतर-मंतरवर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सांगली द्राक्ष संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिला..द्राक्ष, बेदाणा व कृत्रिम फुलांच्या आयातीविरोधात तसेच आयात शुल्क वाढविण्याच्या मागणीसाठी द्राक्ष व फूल उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ३) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले..Farmer Protest: शेतकऱ्यांसाठी देशव्यापी जनआंदोलन उभारणार; राकेश टिकैत यांची घोषणा.या वेळी सांगली द्राक्ष संघाचे विभागीय अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, नाशिक विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब गडाख, सागर आर्वे, दिलीप माने पाटील, मोहन पाटील यांच्यासह सांगली, सोलापूर, नाशिक आणि कर्नाटकातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले..चव्हाण म्हणाले, ‘‘अफगाणिस्तानातून बेकायदेशीर मार्गाने येणाऱ्या बेदाण्याविरोधात यापूर्वी दोन वेळा मोर्चे काढूनही राज्य व केंद्र सरकारने दखल घेतलेली नाही. गतवर्षी चीनमधून सुमारे तीन हजार टन द्राक्षांची आयात झाली. त्यामुळे देशांतर्गत उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. चीनमधून येणाऱ्या द्राक्षांवर शंभर टक्के आयात शुल्क लावल्यास या आयातीवर नियंत्रण मिळवता येईल..Farmer Protest: मध्य प्रदेशात मूग खरेदीवरून संघर्ष तीव्र; १०० टक्के एमएसपीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा सरकारला इशारा.अफगाणिस्तानाच्या नावाखाली इराण, इराक आणि चीनमधील बेदाणा बेकायदेशीर मार्गाने देशात आणला जात असून त्यामागे दर पाडण्याचा काही व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. तसेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कृत्रिम फुलांची आयात होत असल्याने देशातील फूल उत्पादकांनाही फटका बसत आहे. त्यामुळे द्राक्ष, बेदाणा आणि कृत्रिम फुलांच्या आयातीबाबत केंद्र सरकारने तातडीने कठोर निर्णय घ्यावा.’’.प्रमुख मागण्या- पीक विम्याच्या जाचक अटी रद्द करा.- निर्यातीचे अनुदान सुरू करा.- इलेक्ट्रिकल ट्रॅकरला ४० टक्के अनुदान द्या- अन्न प्रक्रिया उद्योगातून बेदाणा उद्योगाला १०० टक्के अनुदान द्या.- ‘आयसीडी’ पोर्ट सुरू करा.- खासगीत बेदाण्याचा सौदा काढू नका..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.