Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean MSP : सोयाबीनची हमीभावाने खरेदी आजपासून

Soybean Market : राज्यात केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमीभावाने सोयाबीनची खरेदी मंगळवारपासून (ता. १५) होणार असल्याचे शासनाने कळविले आहे.

Team Agrowon

Nanded News : राज्यात केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमीभावाने सोयाबीनची खरेदी मंगळवारपासून (ता. १५) होणार असल्याचे शासनाने कळविले आहे. परंतु यात सोयाबीन खरेदीसाठी कृषी विभागाने अद्याप उत्पादकता निश्‍चित केली नाही. तसेच खरेदी केंद्रांना बारदाना उपलब्ध नाही. खरेदी केलेले सोयाबीन कुठे साठवायचे याबाबतही नियोजन नसल्याची माहिती सूत्राने दिली.

हंगाम २०२४-२५ मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने नाफेड व एनसीसीएफकडून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व दि विदर्भ को-आपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, लि. नागपूरमार्फत मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी एक ऑक्टोबरपासून सुरू झाली. यानंतर १० पासून मूग व उडदाची तर १५ पासून सोयाबीनची खरेदी सुरू करण्याचे नियोजन शासनाने केले.

यामुळे राज्यातील २५५ खरेदी केंद्रांवर सोयाबीन उत्पादकांची विक्रीपूर्व नोंदणी सुरू आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्राकडून सोयाबीन विक्रीसाठी मोबाइल संदेश पाठविण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात खरेदीची तारीख जवळ येऊनही अद्याप खरेदीचे नियोजन झाले नाही. यामुळे एकाही शेतकऱ्याला शेतीमाल केंद्रावर आणण्यासंदर्भात संदेश गेला नाही.

यासाठी खरेदी केंद्राकडे सोयाबीन खरेदीसंदर्भात आदेश आले नसल्याची माहिती मिळाली. तसेच शेतकऱ्यांचे सोयाबीन घेताना एकरी किती क्विंटल खरेदी करता येईल, यासंदर्भात संबंधित जिल्ह्याची उत्पादकता जाहीर झाली नाही. सोयाबीन खरेदीसाठी बारदाना अद्याप मिळाला नाही. तसेच खरेदी केलेले सोयाबीन कोणत्या गोदामामध्ये पाठवायचे याबाबत नियोजन नसल्याची माहिती एका खरेदी केंद्र चालकाने दिली.

नाफेड व एनसीसीएफमार्फत खरेदी केंद्रे

राज्यात नाफेड व एनसीसीएफ या दोन केंद्रीय नोडल एजन्सींमार्फत किमान हमीदरानुसार सोयाबीनची खरेदी होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, लि. नागपूरमार्फत सध्या २५५ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात नाफेडकडून १९ जिल्ह्यांत तर एनसीसीएफकडून सात जिल्ह्यांत खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT