Soybean Market : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी १ हजार ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी

Kharif Season : खरीप हंगामातील सोयाबीनची विक्री करण्यासाठी परभणी जिल्ह्यात १ हजार १०१ व हिंगोली जिल्ह्यात ५६० मिळून एकूण १ हजार ६६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: किमान आधारभूत किंमत दराने (हमीभाव) यंदाच्या (२०२४-२५) खरीप हंगामातील सोयाबीनची विक्री करण्यासाठी शुक्रवार (ता. ११) पर्यंत परभणी जिल्ह्यात १ हजार १०१ व हिंगोली जिल्ह्यात ५६० मिळून एकूण १ हजार ६६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सोयाबीनची मंगळवार (ता. १५)पासून खरेदी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळेयांनी दिली.

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत यंदा परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) यांच्या तर्फे सोयाबीन, मूग, उडदाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.

जिल्ह्यात परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ८ ठिकाणी खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी ७ केंद्रांवर शुक्रवार (ता. ११)पर्यंत केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी १ हजार १०१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांच्यातर्फे हमीभावाने सोयाबीन, मूग, उडीद खरेदी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात बळसोंड हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा फाटा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा ही ९ खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. शुक्रवार (ता. ११)पर्यंत या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी ५६० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Soybean
Soybean Market Rate : सोयाबीन भावासाठी मध्यप्रदेशात आंदोलन पेटले; सोयाबीनला हमीभाव नको तर ६ हजार रुपयांची शेतकऱ्यांची मागणी

केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार २०२४-२५ या वर्षासाठी मूग प्रतिक्विंटल ८६८२ रुपये, उडीद प्रतिक्विंटल ७४०० रुपये, सोयाबीन प्रतिक्विंटल ४८९२ रुपये असेकिमान आधारभूत किंमत दर आहेत. यंदाच्या खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याकरिता परभणी व हिंगोली जिल्ह्यांत खरेदी केंद्राच्या ठिकाणी मंगळवार (ता. १)पासून शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

मूग, उडदाची खरेदी गुरुवार (ता. १०) ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू राहील. सोयाबीनची खरेदी मंगळवार (ता. १५) ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत करण्यात येईल. नोंदणीकरित सात-बारा उताऱ्यावर ऑनलाइन पिकपेरा नोंद असावी, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावी. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा. जनधन बँक खाते क्रमांक किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये.

परभणी-हिंगोली जिल्हे हमीभाव सोयाबीन विक्री शेतकरी नोंदणी

स्थिती केंद्र ठिकाण शेतकरी नोंदणी

परभणी ९१

बोरी ९०

सेलू २३५

मानवत १७१

पाथरी ११८

सोनपेठ १६०

पूर्णा २३६

हिंगोली १७

कन्हेरगाव ६८

कळमनुरी ५४

वारंगा १२१

वसमत ८८

जवळा बाजार १६६

येळेगाव ३४

सेनगाव ०२

साखरा १०

संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com