Agriculture Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Subsidy and MSP: सर्व पिकांना हमीभाव,कृषी यंत्रांसाठी अनुदान द्या

Farmers Demand: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (ता.१) देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पातून सरकारने सर्वच पिकांना हमीभाव देण्याची तरतूद करावी, हमीभावाने बाजाराच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, फळपिकांसाठी शीतगृहांची सुविधा वाढवावी, नैसर्गिक शेतीसाठी भरीव तरतूद करावी, शेती अवजारे आणि यंत्रांसाठी अनुदान वाढवावे तसेच सौर वीजजोडणीला गती द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Anil Jadhao 

Pune News: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (ता.१) देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पातून सरकारने सर्वच पिकांना हमीभाव देण्याची तरतूद करावी, हमीभावाने बाजाराच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, फळपिकांसाठी शीतगृहांची सुविधा वाढवावी, नैसर्गिक शेतीसाठी भरीव तरतूद करावी, शेती अवजारे आणि यंत्रांसाठी अनुदान वाढवावे तसेच सौर वीजजोडणीला गती द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारने मागील काही अर्थसंकल्पात शेतीसाठी काही योजना जाहीर केल्या. मात्र योजनांसाठी भरीव तरतूद केली नाही. शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने येऊ घातलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. केंद्राने सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविले आहे. त्यासाठी अनुदानही देत आहे. मात्र सध्या अनुदानासाठी दिला जाणारा निधी कमी आहे. तसेच या योजनेची अंमलबजावणी धिम्या गतीने सुरू आहे. या योजनेला अर्थसंकल्पात भरीव तरतूद देऊन गती द्यावी, अशी मागणी केली आहे.

देशातील शेतीमाल बाजार व्यवस्थेची स्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी योग्य ते पर्याय उपलब्ध नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. सरकारने अर्थसंकल्पात नवीन बाजार व्यवस्था उभारणी करावी तसेच अस्तित्वात असलेल्या बाजारातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी भरीव तरतूद करावी.

तसेच फळे आणि भाजीपाला नाशिवंत असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होते. शेतकऱ्यांना ही नासाडी टाळण्यासाठी आणि साठवणुकीची व्यवस्था निर्माण होण्यासाठी सरकारने देशभरात शीतगृहाचे जाळे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पात शीतगृह सुविधा वाढवण्यासाठी विशेष तरतुदीची आवश्यकता असल्याचेही सांगितले.

शेतकऱ्यांना भासणारी मजुरांची टंचाई ही मोठी समस्या बनली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने शेतीकामांचा मनरेगाच्या कामांमध्ये समावेश करावा. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक तेव्हा मजूर मिळण्यात अडचण येणार नाही. अर्थसंकल्पात याविषयी घोषणा करावी, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या केवळ २३ पिकांचाच समावेश हमीभाव योजनेत करण्यात आला आहे. मात्र फळे, भाजीपाला पिकांसाठी हमीभाव सरकार जाहीर करत नाही. हमीभाव जाहीर होत नसल्याने आणि सरकारी खरेदी नसल्याने शेतकरी अडचणीत येतात. सरकारने शेतीत पिकणाऱ्या सर्व पिकांना हमीभाव योजनेत आणावे आणि हमीभाव जाहीर करावा. तसेच बाजारभावापेक्षा कमी दर झाल्यास खरेदी करावी. यासाठीची घोषणा करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारने सर्व पिकांना हमीभाव जाहीर करावाच. शिवाय या पिकांचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होणार नाहीत, असे आयात-निर्यात धोरण ठरवावे. शेतकऱ्यांना बाजाराच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अर्थसंकल्पात शेतीच्या योजनांसाठी भरीव तरतूद करावी.
रूपेश शंके, युवा जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, लातूर
संपूर्ण शेतीमाल हमीभावाने खरेदीसाठी पायाभूत सुविधेसह सुलभ पद्धत निर्माण करण्यासाठी तरतूद केली पाहिजे. कृषी यांत्रिकीकरण व प्रक्रिया उद्योग यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांच्यासह वैयक्तिक शेतकऱ्याला ही थेट मदत देणारी योजना आणून त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद अपेक्षित आहे.
हेमचंद्र शिंदे, शेतकरी, रावराजूर, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT