Agriculture Tool Subsidy: अवजार अनुदानासाठी अर्जाची शेवटची तारीख २८ जानेवारी; संधी गमावू नका!

Deputy Director, Agriculture Commissionerate, Sushmita Tawte: राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारांवर अनुदान मिळण्यासाठी कृषी विभागाने अर्ज मागविले आहेत. शेतकऱ्यांना २८ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील.
Agriculture Tool
Agriculture ToolAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारांवर अनुदान मिळण्यासाठी कृषी विभागाने अर्ज मागविले आहेत. शेतकऱ्यांना २८ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील, असे कृषी आयुक्तालयातील उपसंचालक सुस्मिता तवटे यांनी कळविले आहे.

कृषी विभागाने संकेतस्थळावर लक्ष्यांक भरल्याशिवाय शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाहीत. अन्न व पोषण सुरक्षितता योजनेत कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात गळीतधान्य अंतर्गत २०२४-२५ या वर्षाकरिता ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर सिंचन साधने (पाइप व पंप) या घटकांचे लक्ष्यांक भरण्यात आले आहेत.

Agriculture Tool
Agriculture Tools : महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे

तसेच ‘कडधान्या’मध्ये बीज प्रक्रिया ड्रम, पौष्टिक तृणधान्य अंतर्गत पल्वरायझर व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात गळीतधान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र (डिबलर), मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रील, छोटे तेल घाणा सयंत्र (ऑइल एक्स्ट्रॅक्टश युनिट) या घटकांचे लक्ष्यांकदेखील भरण्यात आले आहेत.

Agriculture Tool
Agriculture Technology : आंतरमशागतीची आधुनिक अवजारे

अवजारांवर अनुदान मिळण्यासाठी लाभार्थ्यांची निवड ‘महाडीबीटी’वर आलेल्या अर्जातून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘महाडीबीटी’वर सदर बाबींच्या टाइल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मॅकेनायझेशन व इरिगेशन या टाइलमध्ये जाऊन शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.

या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज करावा

शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात, असे श्रीमती तवटे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com