Tur Rate
Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : मूग, तूर वगळता सर्व पिकांत घसरण

डॉ.अरूण कुलकर्णी

१५ सप्टेंबर रोजी संपणाऱ्या पंधरवड्यात, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेने कापूस, (Cotton) मका (Maize Rate) व सोयाबीन यांची आवक (Soybean Arrival) मोठ्या प्रमाणात वाढली. याउलट मूग, तूर (Tur) व टोमॅटो यांची आवक घटली. या सप्ताहात मूग व तूर वगळता सर्वच पिकांचे भाव घसरले. कापसाचे भाव ९.२ टक्क्यांनी घसरले, तर सोयाबीनमध्ये ३.१ टक्क्यांची घट झाली. तूर व मुगाच्या खरीप आवकेने अजून जोर पकडलेला नाही. कांदा व टोमॅटो यांनी सुद्धा किमतीत घट अनुभवली.

या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे (Cotton Rate) व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) ऑगस्ट महिन्यात वाढत होते. या महिन्यात मात्र ते घसरत आहेत. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ५.९ टक्क्यांनी घसरून रु. ४०,०६० वर आले होते; या सप्ताहात ते पुन्हा ९.२ टक्क्यांनी घसरून ३६,३९० वर आले आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरी भाव ७ टक्क्यांनी घसरून रु. ३२,३९० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट (Cotton Spot Rate) भाव (प्रति २० किलो) ५.५ टक्क्यांनी घसरून रु. १,८९१ वर आले आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा (Cotton MSP) अधिक आहेत. हेजिंगसाठी अनुकूल वेळ आहे.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती ऑगस्ट महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती १ टक्क्याने घसरून रु. २,४७५ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑक्टोबर डिलिव्हरी) किमती १.४ टक्क्याने वाढून रु. २,४८६ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,५१० वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. ७,४०७ वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी घसरून रु. ७,२०७ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती ५.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,८४८ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. ७,१६० वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्याने घसरून रु. ४,६६१ वर आल्या आहेत. हमीभाव रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाच्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,१०० वर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत. गेल्या दोन आठवड्यांत मुगाची आवक पावसामुळे कमी झाली आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) ऑगस्ट महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती ५ टक्क्यांनी वाढून रु. ५,४५५ वर आली होती; या सप्ताहात मात्र ती पुन्हा ३.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,२८९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ऑगस्ट महिन्यात घसरत होती. या सप्ताहात ती ४.६ टक्क्यांनी वाढून रु. ७,२८५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती ऑगस्ट महिन्यात रु. १,२५० च्या आसपास चढ-उतार अनुभवत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२६३ होती; या सप्ताहात ती रु. १,१६३ वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. या महिन्यात त्या वाढू लागल्या आहेत. या सप्ताहात मात्र टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) गेल्या सप्ताहाच्या तुलनेने १३.९ टक्क्यांनी घसरून रु. १,५६० पर्यंत आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

२४ सप्टेंबर २०२२

ब-६, कलाबसंत सोसायटी, १५वी गल्ली, भांडारकर रस्ता, पुणे ४११ ००४; फोन : ९४२०१७७३४८ arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

Loksabha Election : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

Water Scarcity : पुणे विभागात पाण्यासाठी वणवण

Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

SCROLL FOR NEXT