Soybean Harvesting : सोयाबीन काढणीची मजुरी महागली

यंदाच्या मोसमातील सोयाबीन हंगामाला लवकरच सार्वत्रिक स्वरूपात प्रारंभ होत आहे. सोयाबीन सोंगणीसाठी मजुरांची शोधाशोध शेतकरी घेत आहे.
Soybean Crop
Soybean CropAgrowon

अकोला ः यंदाच्या मोसमातील सोयाबीन हंगामाला (Soybean Season) लवकरच सार्वत्रिक स्वरूपात प्रारंभ होत आहे. सोयाबीन सोंगणीसाठी (Soybean Harvesting) मजुरांची शोधाशोध शेतकरी घेत आहे. मजुरांनी (Labor Wage Soybean Harvesting) यंदा त्यांचे दर सर्वत्र वाढविले आहेत. एकरी २८०० पासून, तर ३४०० पर्यंत वेगवेगळे दर भागनिहाय ठरवले जात आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी ही दरवाढ झाली आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Soybean Crop
Soybean Crop : सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर

सध्या पावसाने थोडा दिलासा दिल्याने सोयाबीन कापणीसाठी शेतकरी मजुरांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. जमिनीत ओल असल्याने यंदा अनेक भागांत सध्या हार्वेस्टर शेतापर्यंत पोहोचणे कठीण आहे. परिणामी मजुरांकडूनच सोयाबीन सोंगणी, सुडी लावण्याचे काम करवून घेणे सुरू आहे. हार्वेस्टरनेही सोयाबीन काढणीचा दर १५०० रुपये आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Soybean Crop
Soybean Production : सोयाबीनचे उत्पादन यंदा घटणार

यंदा सातत्याने पाऊस झाल्याने काही भागात सोयाबीनला मोठा फटका बसला. कमी सूर्यप्रकाशामुळे पिकाची वाढ पुरेशी झालेली नाही. मोजक्याच पट्ट्यात सोयाबीनचे पीक चांगले आहे. लागवडसुद्धा एकसारखी नसल्याने सोयाबीनची काढणी आता मागे-पुढे होत आहे.

सुरुवातीच्या टप्प्यातील सोयाबीन काढणीसाठी तयार आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च भरमसाट वाढला आहे. शेतकऱ्यांना १५ ते २० हजारांदरम्यान एकरी खर्च आला आहे. आता उत्पादकता काय येते आणि दर कसे राहतात, यावर सोयाबीन उत्पादकांचे नफातोट्याचे अर्थकारण अवलंबून आहे.

सततच्या पावसाने सोयाबीनची वाढच झालेली नाही. त्यामुळे यंदा हार्वेस्टरने सोयाबीन काढणे जुळणार नाही. मजुरांशिवाय पर्याय नाही. तर मजुरांकडून आतापासूनच सोयाबीनची कापणी प्रतिबॅग ३ हजार रुपये आहे. गेल्या वर्षीपेक्षा ४०० रुपयांनी दर वाढला आहे.
रामराव राऊत, जामदरा, कवठळ, जि. वाशीम
गेल्या वर्षी सोयाबीन सोंगणी व सुडी लावणे प्रतिएकर २८०० ते ३००० रुपये होते. यावर्षी त्याच कामाचा दर प्रतिएकर ३२०० ते ३४०० रुपये पोचला आहे. एकराला ४०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे.
कैलास नागरे, शेतकरी, शिवणी आरमाळ, जि. बुलडाणा
मजूर ३५०० ते ३८०० रुपये मागत आहेत. शेतकरी २८०० ते ३२०० रुपये देण्याच्या तयारीत आहेत. या वर्षी सोयाबीनचा दर पाच हजारांपर्यंत राहील. तेव्हा खर्च आणि उत्पादन याचा समतोल हवा. अन्यथा, शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगण्यासाठी व्याजाने पैसे काढून द्यावे लागतील.
डॉ. गजानन गिऱ्हे, देऊळगावमाळी, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com