Maize Rate : मक्यातील तेजी का नरमली?

देशातील बाजारात सध्या मक्याच्या दरातील तेजी कमी झालेली आहे. रशिया-युक्रेन युध्दामुळं जागतिक बाजारात मक्याचा तुटवडा निर्माण होऊन दर वाढले.
Maize Rate
Maize RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः देशात सध्या मक्याचा साठा (Maize Stock) मर्यादीत आहे. मात्र वाढलेल्या दरात (Maize Rate) मक्याचा उठाव कमी होतोय. पशुखाद्यात (Animal Feed) पर्यायी खाद्याचा वापर वाढतोय. त्यामुळं मका दरातील (Maize Rate Boom) तेजी नरमली. दक्षिणेतील काही बाजारांमध्ये (Maize Arrival) नवा मका दाखल झालाय. राज्यात नोव्हेंबरमध्ये आवक वाढेल.

Maize Rate
Maize Rate : मक्याचा दर का नरमला?

देशातील बाजारात सध्या मक्याच्या दरातील तेजी कमी झालेली आहे. रशिया-युक्रेन युध्दामुळं जागतिक बाजारात मक्याचा तुटवडा निर्माण होऊन दर वाढले. ऑगस्ट महिन्यात मका दराने बाजारात २८०० रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यामुळं ऑक्टोबरपर्यंत मका ३ हजारांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करत होते. मात्र झालं उलटं.

मक्याचा मुख्य ग्राहक असलेला पोल्ट्री उद्योगही बहरात येत होता. जिवंत पक्ष्यांचे दर म्हणजेच पोल्ट्री उत्पादकांना मिळणारा दर मार्जिन देणारा ठरत होता. पोल्ट्रीचे दर १०० रुपयांपेक्षा अधिक झाले होते. त्यामुळं मक्याल्याही उठाव मिळेल, अशं वाटतं होतं. मका दर वाढण्याऐवजी नरमले.

Maize Rate
Maize Production : जागतिक मका उत्पादन घटणार

देशातील बाजारात सध्या मक्याला २ हजार ४०० ते २५५० रुपये दर मिळतोय. त्यामुळं तेजीची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. मका दर दबावात येण्यामागं मुख्य कारण होतं पर्यायी खाद्यातील पडतळ. मक्याचा दर २८०० रुपयांवर पोचल्यानंतर पोल्ट्री उद्योगात तांदळाचा वापर वाढला. त्याला बाजरीचीही जोड मिळाली.

देशात दरवर्षी २७५ ते २८० लाख टनांच्या दरम्यान मका उत्पादन होतं. मात्र केंद्र सरकारच्या मते मागील हंगामात ३३६ लाख टन उत्पादन झालं. मात्र उद्योगाला हा अंदाज मान्य नाही. देशात पोल्ट्री, मानवी आहार, इतर पशुखाद्य आणि निर्यातीसाठी सरासरी २८० लाख टन मका लागतो.

मक्याचा सर्वाधिक वापर हा पशुखाद्यासाठी होतो. तर २ ते ३ टक्के मका इथेनाॅलसाठी जातो. यंदा जवळपास ४० लाख टन मका निर्यात झाल्याचा अंदाज आहे. देशात सध्या १० ते १२ लाख टनांच्या दरम्यान मक्याचा साठा असू शकतो. निर्यातही सुरु आहे. ऑगस्ट महिन्यात जवळपास २ लाख टन मका निर्यात झाली होती. तर सप्टेंबर महिन्यातील निर्यात दीड लाख टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

दक्षिणेतील काही बाजारांमध्ये मक्याची आवक सुरु झाली. राज्यातील आवक नोव्हेंबरमध्ये सुरु होईल. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कीड-रोगांचा प्रादुर्भावही वाढतो. त्यामुळं खरिपात मका उत्पादन किती होईल आणि बाजारभाव काय राहू शकतो, याबाबत पुढील महिन्यात सांगता येईल, असं जाणकारांनी सांगितलं. मात्र पुढील दीड महीना मका दर टिकून राहतील आणि आवक वाढल्यानंतर २१०० ते २२०० रुपयांचा प्राथमिक अंदाज आहे, असंही जाणकारांनी सांगितलं.

देशात सध्या मक्याचा पुरवठा मर्यादीत आहे. मात्र मका दर वाढल्यानंतर तांदळाचा वापर पोल्ट्री उद्योगात वाढतोय. त्यातच तांदळावरील निर्यातशुल्क आणि तुकडा तांदूळ निर्यातबंदीमुळं दर कमी झाले. याचा अप्रत्यक्ष दबाव हा मका दरावर येतोय. मात्र ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मक्याचा बाजारभाव २५०० रुपयांपेक्षा कमी होणार नाही, असा अंदाज आहे.
दीपक चव्हाण, शेतीमाल बाजार अभ्यासक
भारतात मक्याला यंदा चांगला दर मिळाला. आताही दर हमीभावापेक्षा ५०० ते ६०० रुपयांनी अधिक आहेत. त्यातच देशातील मक्याचा साठा मर्यादीत आहे. त्यामुळं पुढील दीड महिना मका तेजीतच राहण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही मक्याला चांगला भाव मिळतोय. याचाही आधार देशातील बाजाराला मिळतोय.
श्रीकांत कुवळेकर, शेतीमाल बाजार विश्लेषक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com