Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : सोयाबीनवरील दबाव कायम; कापूस, सोयाबीन, टोमॅटो तसेच काय आहेत आजचे ज्वारी दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, डाळिंब आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन पुन्हा नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील घट कायम आहे. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे कमी होऊन १०.०२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात नरमाई आली आहे. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६७५ रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात घट

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात आज भाव काहिसे कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७१.३५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५६ हजार ६२० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

टोमॅटोच्या दरात चढ उतार

टोमॅटोची बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात चांगली वाढ झाली होती. मात्र वाढलेल्या भावात मागणीवर काहिसा परिणाम  दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. मात्र टोमॅटोचे वाढलेले सरासरी भाव कायम आहेत. आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसून आला. बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी दिला. 

डाळिंबाचा भाव टिकून

राज्यातील बाजारात डाळिंबाला चांगला उठाव आहे. मात्र दुसरीकडे बाजारातील डाळिंबाची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे डाळिंबाचा बाजार टिकून आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा जाणवत आहे. गुणवत्तापूर्ण डाळिंबाला बाजारात सध्या चांगला भाव मिळत आहे. राज्यातील बाजारांमध्ये डाळिंबाला सध्या सरासरी ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुणवत्तापूर्ण मालाचा भाव १० हजारांपेक्षाही जास्त असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. डाळिंबाचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ज्वारीचा बाजार दबावातच

देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण  शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT