Pomegranate Disease : मृग बहरातील डाळिंबाला अतिवृष्टीचे ‘ग्रहण’

Pomegranate Orchard Issue : देशातील मृग बहरातील डाळिंबाला यापूर्वी पाणीटंचाईचा फटका बसला होता. त्यातच सध्याच्या परिस्थितीत अति पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे तेलकट डाग रोगाचा प्रसार वाढला आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

Sangli News : देशातील मृग बहरातील डाळिंबाला यापूर्वी पाणीटंचाईचा फटका बसला होता. त्यातच सध्याच्या परिस्थितीत अति पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे तेलकट डाग रोगाचा प्रसार वाढला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तेलकट रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. प्रादुर्भावामुळे फळे खराब होत असल्याने उत्पादनही घटणार असल्याचे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे.

देशातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात ६० हजार हेक्टरवर मृग बहर धरला आहे. परंतु हा बहर धरण्यासाठी शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

गतवर्षीच्या तुलनेत या बहराखालील १० हजार हेक्टर क्षेत्राने वाढ झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी डाळिंब बागा फुलवल्या आहेत. मे महिन्यात चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे आगाप मृग बहरातील बागांमध्ये काडी चांगली तयार झाली. गेल्या महिन्यात अति पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा आगाप मृग बहरातील फुलोरावस्थेत असलेल्या बागेला फटका बसला.

Pomegranate
Pomegranate Rate : मर्यादित आवकेमुळे डाळिंबाचे दर २०० पार

या बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फूलगळ झाली. सध्या फळ १५० ग्रॅम वजनापर्यंत आहे. देशातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या सर्व राज्यात अति पाऊस झाला. बागांमध्ये पाणी साचून राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा डाळिंबावर पावसाचे संकट ओढावले. फळावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या रोगाने ३० टक्के डाळिंब बागा प्रादुर्भावग्रस्त आहेत. कधी ढगाळ वातावरण, तर कधी पाऊस यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रोगग्रस्त फळे काढून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाही. परिणामी, उत्पादनात घट होणार असल्याचे चित्र आहे. मृग बहरातील फळे दिवाळीच्या दरम्यान विक्रीला येतील.

Pomegranate
Pomegranate Export : डाळिंबाचा पहिला कंटेनर ऑस्ट्रेलियाला रवाना

आंबिया बहरातील डाळिंबाच्या दरात वाढ

देशातील आंबिया बहरातील डाळिंब विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्याकडे पोहोचला आहे. या बहरातील डाळिंबाला तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बाजारात आवक मंदावली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने डाळिंबाच्या दरात गेल्या महिनाभरात वाढ झाली आहे. ऑगस्टच्या मध्यावर दर्जेदार डाळिंबाला १५० ते १६० रुपये असा दर होता. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दर्जेदार डाळिंबाच्या दरात प्रति किलोला ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. अर्थात सध्या डाळिंबाला प्रति किलोस २०० रुपये असा दर मिळत आहे. तर, दोन नंबर प्रतीच्या डाळिंबाला १५० रुपये दर आहे.

राजस्थानात पीक चांगले

राजस्थानमध्ये यंदा डाळिंबाला पोषक वातावरण आहे. या वर्षी कमी पाऊस झाला असला तरी बागा चांगल्या फुलल्या असून रोगांचा फारसा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे राजस्थानमधील डाळिंब उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

अति पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका आंबिया आणि मृग बहरातील डाळिंबाला बसला आहे. त्यामुळे उत्पादन कमी मिळाले असले तरी दर चांगले आहेत. परंतु उत्पादन खर्च वाढल्याने आर्थिक ताळमेळ लागणे कठीण बनले आहे. यंदा पिन होल बोअरचा प्रादुर्भाव कमी दिसत असून, ही एक चांगली बाब आहे.
प्रभाकर चांदणे, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com