Agriculture Commodity Market : तूर, हरभऱ्याच्या किमतींत घट

Market Update : कापूस, मका, मूग, सोयाबीन, कांदा या पिकांतील आवक सुरू झाली आहे. ऑक्टोबरमधील कोरड्या हवामानामुळे या वर्षी लवकर आवक सुरू होत आहे.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Agriculture Market Rate :

फ्यूचर्स किमती : सप्ताह ५ ते ११ ऑक्टोबर २०२४

कापूस, मका, मूग, सोयाबीन, कांदा या पिकांतील आवक सुरू झाली आहे. ऑक्टोबरमधील कोरड्या हवामानामुळे या वर्षी लवकर आवक सुरू होत आहे. खरीप व रब्बी दोन्ही पिकांचे उत्पादन या वर्षी चांगले होण्याची शक्यता असल्याने हमीभावाचा आधार घेण्याची गरज वाढणार आहे.

या सप्ताहात टोमॅटो वगळता सर्व वस्तूंचे भाव घसरले. तुरीच्या भावात लक्षणीय घट होऊन ते रु. ९००० च्या खाली आले आहेत. सोयाबीनचे भाव जवळपास स्थिर आहेत.

११ ऑक्टोबर २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेतः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात १.८ टक्क्याने घसरून रु. ५७,८२० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५६,४०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव ०.४ टक्क्याने घसरून रु. ५७,००० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव रु. ५७,७०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. भविष्यात कापसाचे भाव कमी होतील, असा अंदाज हे भाव दर्शवितात. कापसाची आवक वाढू लागली आहे.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात २.२ टक्क्यांनी घसरून रु. १,५४८ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५८७ वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,५८० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.१ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७५२१ आहेत. एप्रिल फ्यूचर्स हमीभावापेक्षा रु. ७६ ने अधिक आहेत.

Agriculture Market
Sugar Market : दसऱ्याच्या खरेदीत साखरेला अपेक्षित दर नाही

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात ३ टक्क्यांनी घसरून रु. २,४५० वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती रु. २,४७० वर आल्या आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. २४९९ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २ टक्क्यांनी अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मध्ये या महिन्यात हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १४,२४० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्याने घसरून रु. १४,१५४ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती ४.१ टक्क्यांनी घसरून रु. १३,५७४ वर आल्या आहेत. एप्रिल किमती रु. १४,२२० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.५ टक्क्याने अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३.८ टक्क्यांनी घसरून रु. ७७०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३.९ टक्क्यांनी घसरून रु. ७,४०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव या महिन्यात जाहीर झाला होईल.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.३ टक्क्याने घसरून रु. ७९०० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८६८२ आहे. किमती कमी होत आहेत.

Agriculture Market
Onion Market : खरीप कांद्याला मुहूर्ताचा प्रतिक्विंटल ७१०० रुपये दर

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.५ टक्क्याने वाढून रु. ४६७१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.३ टक्क्याने घसरून रु. ९७९५ वर आली होती. या सप्ताहात ती ८.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,९९४ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल; पण साठ्यातील आवक वाढती आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ४३३० होती; या सप्ताहात ती रु. ४३३८ वर आली आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४५०० वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. ४७५० वर आली आहे. आवकेत उतरता कल आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com