Poultry Feed Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Broiler Chicken Rate : मांसल कोंबडीसह अंडी दरात वाढ

Egg Rate : गेल्या अनेक दिवसांपासून दबावात असलेल्या मांसल कोंबडी आणि अंडी दरात आता तेजी अनुभवली जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : गेल्या अनेक दिवसांपासून दबावात असलेल्या मांसल कोंबडी आणि अंडी दरात आता तेजी अनुभवली जात आहे. मांसल कोंबडीचे दर पूर्वीच्या ८० रुपयांवरून आता ११५ रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे मांसल कोंबडी उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. त्यासोबतच अंडी दरही प्रति शेकडा (१०० नग) हे ३५० रुपयांवरून ५०० रुपयांवर पोहोचले आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात मांसल तसेच लेअर कोंबड्यांमध्ये मर्तुकीचे प्रमाण वाढते. तापमानात वाढ होत असल्याच्या परिणामी लेअर कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता देखील कमी होते. परंतु करारावर कुक्‍कुटपालनास प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांकडून अधिक वजनाच्या कोंबड्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. त्याच्या परिणामी बाजारात अशा मांसल कोंबड्यांची संख्या अधिक आणि मागणी कमी अशी विरोधाभासी स्थिती निर्माण होते. त्याचा दरावरही परिणाम होत ते दबावात येतात, असे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.

कंपन्यांच्या याच धोरणामुळे गेल्या आठवड्यापर्यंत मांसल कोंबड्यांचे दर (प्रति दोन किलो) ८० रुपयांवर आले होते. या व्यवहारातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य होत नव्हती. आता तापमानात वाढीच्या परिणामी पोल्ट्री व्यावसायिकांकडे मर्तुकीचे प्रमाण तुलनेत वाढीस लागले आहे.

त्यामुळे बाजारात मांसल कोंबड्यांची आवक कमी झाली आहे. दुसरीकडे मागणी वाढल्याने दरात सुधारणा अनुभवली जात आहे. सध्या मांसल कोंबड्याचे दर पूर्वीच्या ८० रुपयांवरून ११५ रुपयांवर गेले आहेत, अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिक शुभम महाले यांनी दिली.\

इतर भागातूनही महाराष्ट्रात अंडी आवक

राज्यात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९ लाखांवर असल्याचे सांगितले जाते. यातील लेअर पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रमाण कमी आहे. सध्या राज्यात रोज सरासरी एक कोटी अंडी मागणी राहते. त्याची पूर्तता राज्यातील लेअर पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून शक्‍य होत नाही. परिणामी देशाच्या इतर भागातूनही महाराष्ट्रात अंडी आवक होते, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

अंडी दर ५०० रुपये शेकडावर

लेअर कोंबड्याही उन्हाळ्यात प्रभावित होतात. त्यामुळे त्यांचे अंडी देण्याचे प्रमाण कमी होते, असे सांगितले जाते. सध्या अंड्याची मागणी अधिक असल्याने मोठा तुटवडा निर्माण होत आहे. परिणामी गेल्या आठवड्यापर्यंत ३५० रुपये प्रति शेकडा असा दर असलेले अंडी दर आता ५०० रुपये शेकडावर पोहोचले आहेत, अशी माहिती मातोश्री पोल्ट्रीचे संचालक रवींद्र मेटकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT