
Amaravati News : राज्याच्या काही भागात बर्ड फ्लूमुळे मांसल कोंबड्यांचा बाजार प्रभावित झाला होता. त्यानंतर पसरलेल्या अफवामुळे दरही चांगलेच दबावात आले. मात्र आता बऱ्याचअंशी परिस्थिती निवळल्याने एप्रिलपासून बाजार पूर्वपदावर येईल, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
भारत हा जागतिकस्तरावर पाचव्या क्रमांकाचा ब्रॉयलर मांस उत्पादक देश ठरला आहे. २०२४-१५ ते २०२०-२१ दरम्यान या उद्योगाची चक्रवाढ पद्धतीने वार्षिक दरवाढ ७.९ टक्के इतकी होती. ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगात त्यानंतरच्या काळात सातत्याने वाढ नोंदविली गेली आहे. २०२३ मध्ये भारताचा पोल्ट्री बाजार २,०९९.२ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचला. महाराष्ट्रात देखील सात लाखांवर पोल्ट्री व्यावसायिक आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून याकडे शेतकरी वळत असल्याने या संख्येत सातत्याने वाढ नोंदविली गेली आहे.
मांसल पक्ष्यांना वाढती मागणी हे देखील त्यामागील एक कारण सांगितले जाते. मांसल उत्पादनासंदर्भाने महाराष्ट्राची विस्तारीत बाजारपेठ लक्षात घेता खासगी कंपन्यांकडून करारावर मांसल पक्ष्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याअंतर्गत एक दिवसाच्या पक्ष्यासह त्याकरिता लागणारे खाद्य आणि औषधांचा पुरवठा देखील कंपन्या करतात. मात्र याचा वैयक्तिक स्तरावर कुक्कुटपालन करणाऱ्यांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जाते. कारण कंपन्या बाजारात दोन किलोपेक्षा अधिक वजनाचा पक्षी आणतात.
त्यामुळे बाजारात मालाची उपलब्धता अधिक राहत असल्याने तो विकल्या गेल्याशिवाय उर्वरित मालाला उठाव राहत नाही. त्यामुळे बाजारात सातत्याने चढउतार होतात. नजीकच्या काळात बर्डफ्लू विषयक अफवांमुळे देखील बाजारात दर दबावात आले. सद्यःस्थितीत सरासरी दोन किलो वजनाच्या मांसल पक्ष्याचा उत्पादकता खर्च ९० रुपये असताना बाजारात मात्र उत्पादकता खर्चापेक्षाही कमी दराने मांसल कोंबड्यांची विक्री होत आहे.
रविवारी (ता. २३) विदर्भात ७५ ते ८० रुपये तर पश्चिम महाराष्ट्रात ८० रुपये असा मांसल पक्ष्यांचा (प्रति दोन किलो) दर होता. कुक्कुट व्यावसायिक एक दिवसाच्या पक्ष्यांची खरेदी संगोपनकामी कंपन्यांकडून करतात. ४० दिवसांपूर्वी पक्ष्याचे दर ५२ रुपये प्रति नग होते. आता ते ३५ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे उत्पादकता खर्चही वाढता होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.