Pomegranate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Crop Damage : गुजरातमध्ये अतिवृष्टीचा मृग बहरातील डाळिंबाला फटका

Pomegranate Market Update : गुजरातमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका डाळिंब पिकाला बसला आहे. परिणामी, फुलोरावस्थेत असलेल्या बागांमध्ये फुलगळ, करपा आणि तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : गुजरातमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका डाळिंब पिकाला बसला आहे. परिणामी, फुलोरावस्थेत असलेल्या बागांमध्ये फुलगळ, करपा आणि तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे राज्यातील मृग बहरातील डाळिंबाचे सुमारे ६० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला.

गुजरातमध्ये डाळिंबाचे अंदाजे २० हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. गतवर्षी गुजरातमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे गेल्यावर्षी राज्यात सुमारे १० ते १२ हेक्टरवर मृग बहर धरला होता. पोषक वातावरण आणि कमी पाऊस यामुळे डाळिंबाचे फारसे नुकसान झाले नव्हते.

दरही चांगले मिळाले होते. त्यामुळे राज्यात डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता, गुजरातमध्ये मृग आणि अंबिया हे दोन बहर प्रामुख्याने घेतले जातात. राज्यासह महाराष्ट्रात डाळिंब विक्रीला येतात.

गुजरातमध्ये यंदाच्या मृग बहर हंगामात १२ ते १३ हजार हेक्टरवर बहर धरला आहे. सध्या डाळिंब बागा फुलोरावस्थेत आहेत, तर काही ठिकाणी लिंबाच्या आकाराची फळे लागली आहेत. पोषक वातावरण असल्याने येथील शेतकऱ्यांनी बागा चांगल्या साधल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवासांपासून अतिवृष्टी सुरू आहे.

सतत पाऊस सुरू असल्याने बागामध्ये पाणी साचले आहे. परिमाणी फुलोरावस्थेत असलेल्या बागांमध्ये फूलकळी गळ होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यातच करपा आणि तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यामुळे राज्यात सुमारे ६० टक्के बागांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

पीन होल बोअरचा प्रादुर्भाव

गुजरामध्ये पीन होल बोअरचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे या प्रादुर्भावापासून बागा वाचल्या होत्या. मात्र, यंदापासून डाळिंबामध्ये ‘पीन होल बोअर’चा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली असल्याने डाळिंबाच्या बागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर नवे संकट आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गुजरातमध्ये पावसाचा फटका मृग हंगामातील डाळिंबाला बसू लागला आहे. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने सध्या ६० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT