
Pomegranate Production : लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या ९ वर्षांपासून डाळिंबाचे लिलाव सुरू झाले आहेत. आवारात सोमवारी (ता. १०) सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते डाळिंब लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी दिवसभरात २९९ क्रेट आवक झाली. प्रतिक्रेट किमान २०० ते कमाल ५१०० व सरासरी २०११ रुपये याप्रमाणे दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव व सिन्नर, नगर जिल्ह्यांतील कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर व कन्नड आदी तालुक्यांत डाळिंबाच्या लागवडी आहेत. या उत्पादित मालाच्या विक्रीची सोय व्हावी, म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या ९ वर्षांपासून डाळिंब लिलाव करण्यात येतात.
डाळिंब उत्पादकांनी शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजन मापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असून, स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल, असे क्षीरसागर यांनी या वेळी सांगितले. सुरुवातीला अरुण आव्हाड (रा. आंबेगाव) यांच्या शेतीमाल क्रेटचे विधीवत पूजन करण्यात आले. दिवसभरात २९९ क्रेट आवक झाली. प्रतिक्विंटल बाजारभाव किमान २०० ते कमाल ५१०० व सरासरी २०११ रुपये याप्रमाणे मिळाला.
उपसभापती गणेश डोमाडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह बाजार समितीचे सदस्य भीमराज काळे, जयदत्त होळकर, संदीप दरेकर, छबूराव जाधव, सोनिया होळकर, श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे, रमेश पालवे, सहसचिव प्रकाश कुमावत, लिलाव प्रमुख सुरेश विखे, लेखापाल सुशील वाढवणे, पंकज होळकर, हिरालाल सोनारे, संदीप निकम, प्रभारी भास्कर उगलमुगले, संजय होळकर, सचिन वाघ, सचिन बैरागी, शुभम उपाध्ये, प्रमोद जाधव, डाळिंब व्यापारी अखलाख अन्सारी, गफार नाईकवाडी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.