Pomegranate Management : डाळिंबासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक

Crop Management : डाळिंबासाठी योग्य व्यवस्थापन केले तरच भरघोस उत्पादन मिळून शेतकऱ्यांना समृद्धीकडे वाटचाल करता येईल, असे प्रतिपादन बदनापूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश अहिरे यांनी केले.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

Jalna News : डाळिंबासाठी योग्य व्यवस्थापन केले तरच भरघोस उत्पादन मिळून शेतकऱ्यांना समृद्धीकडे वाटचाल करता येईल, असे प्रतिपादन बदनापूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश अहिरे यांनी केले.

ॲग्रोवन व कोरोमंडल इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने चिकनगाव (ता. अंबड) येथे आयोजीत ॲग्रोवन संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण उकिर्डे होते. डॉ. अहिरे यांनी शेतकऱ्यांना डाळिंबाच्या लागवडीच्या अनुषंगाने सखोल मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, की डाळिंबाची लागवड हलक्या ते मध्यम जमिनीवरच करावी. पाण्याचा निचरा चांगला झाल्यामुळे तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. तसेच लागवडीच्या अगोदर माती परिक्षण करावे, फ्री कॅल्शिअमचे प्रमाण ६ टक्क्यांच्या आत असेल तरच डाळिंबाची लागवड करावी.

कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्यास दिलेली खते झाडे शोषून घेऊ शकत नाही. डाळिंबाची लागवड ही १४ बाय १४ फुटावरच करण्याची गरज आहे. यामुळे बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळीत राहण्यास मदत होते, असे ते म्हणाले.

Pomegranate
Pomegranate Farming : दुष्काळ सोसत केली डाळिंब शेती यशस्वी

कोरोमंडलचे विभागीय व्यवस्थापक वैभव राठी यांनी कोरोमंडलच्या विविध उत्पादनांची माहिती दिली, त्याचप्रमाणे खतांचा वापर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच करावा असे आवाहन केले. कोरोमंडलचे प्रसिद्धीप्रमुख अमित जैन यांनी माती परिक्षण करुनच खते द्यावी तसेच डाळिंबामध्ये क्रॅकींगसारखी (फळ तडकणे) समस्या येवू नये म्हणून बोरॉनचा वापर करावा असे सांगितले.

Pomegranate
Pomegranate Market : लासलगावमध्ये डाळिंब प्रतिक्रेट २०११ रुपये भाव

सचिन पाटील यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ॲग्रोवनचे अजित वाणी यांनी प्रास्ताविकात ॲग्रोवनच्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रगतिशील शेतकरी रामेश्वर लबडे यांनी केले.

आभार सुनील दाभाडे यांनी मानले. कार्यक्रमाला कोरोमंडलचे साहाय्यक व्यवस्थापक उदय चौधरी, सरपंच रामेश्वर खांडेभराड, प्रगतिशील शेतकरी मयूर गायकवाड, राधाकिशन महेर, राजू खांडेभराड, विठ्ठल लबडे, ज्ञानेश्वर खांडेभराड, बाळू चौधरी यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com