Papaya Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market: खानदेशात पपईची आवक घटली, दर स्थिर

Fruit Market: खानदेशात पपईची आवक घटली असून शेतकऱ्यांना १४ ते १८ रुपये प्रतिकिलो दर मिळतोय. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन कमी असून उत्तर भारतात मागणी वाढली आहे. दर वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात पपई दर स्थिर आहेत. यंदा प्रतिकूल स्थितीमुळे पपई आवक अल्प किंवा कमी असून, शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदीसंबंधी १४ ते १८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. आवक कमी असून, दर्जेदार पपईची पाठवणूक उत्तरेकडे होत आहे.

किमान दर १४ रुपये प्रतिकिलोचा आहे. शेतकऱ्यांना जागेवर दर बऱ्यापैकी मिळत आहे. परंतु उत्पादन कमी किंवा हवे तसे नाही. यंदाच्या पावसासह त्यापूर्वीच्या अतिउष्णतेमुळे हंगाम लांबला आहे. परिणामी आवकेवर त्याचा परिणाम दिसत आहे.

पपईचा काढणी हंगाम खानदेशात ऑक्टोबर महिन्यात जोमात सुरू होतो. यंदा विषम वातावरण व इतर समस्यांमुळे उत्पादन कमी आहे. रोपांची उपलब्धता यंदा चांगली होती. यात अनेकांनी पपईची लागवड मे महिन्यात किंवा उशिरा केली आहे.

यामुळे आवकही कमी आहे. दुसरीकडे खरेदीदारांकडून पपईस सध्या मागणी आहे. सणासुदीचे दिवस आहेत. पपईचा उत्पादन खर्च यंदा वाढला आहे. जागेवर २५ रुपये प्रतिकिलोचा दर हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली जात आहे.

मध्यंतरी शहादा (जि.नंदुरबार) येथील पपई उत्पादकांनी खरेदीदार, व्यापाऱ्यांशी दरांबाबत चर्चा केली. परंतु दरांत फारशी किंवा वाढ झालेली नाही. खानदेशातील पपईला उत्तर भारतात मोठी मागणी आहे. उठाव वाढला आहे.

अशात खरेदीदारांकडून वाहने आणून कमी पक्व पपईचीदेखील खरेदी केली जात आहे. कारण पपईचा तुटवडा आहे. सध्या खानदेशात रोज १० ते १२ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT