Orange  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Orange Import Duty : बांगलादेशकडून संत्रा आयात शुल्कात पुन्हा वाढ

Orange Export : नैसर्गिक संकटांमुळे उत्पादकता प्रभावित होत आधीच मेटाकुटीस आलेल्या संत्रा उत्पादकांच्या अडचणीत बांगलादेशकडून आयात शुल्कात करण्यात आलेल्या वाढीच्या परिणामी भर पडली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : नैसर्गिक संकटांमुळे उत्पादकता प्रभावित होत आधीच मेटाकुटीस आलेल्या संत्रा उत्पादकांच्या अडचणीत बांगलादेशकडून आयात शुल्कात करण्यात आलेल्या वाढीच्या परिणामी भर पडली आहे. बांगलादेशने पूर्वीच्या ८८ टका या आयात शुल्कात आता १०१ टका (बांगलादेशी चलन, ७१ रुपये भारतीय) अशी वाढ केली आहे.

महाराष्ट्रासह देशातील राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नागपुरी संत्रा घेतला जातो. त्यासोबतच पंजाबमध्ये किनो जातीच्या संत्र्याची लागवड आहे. महाराष्ट्रात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड असून, त्यातील एक लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात असून, नागपूर विभागात २५, तर उर्वरित महाराष्ट्रात २५ हजार हेक्‍टर याप्रमाणे क्षेत्र विस्तार आहे. राज्याची संत्रा उत्पादकता ही दहा लाख टन इतकी आहे.

पंजाबमधील किन्नो संत्रा चव आणि दर्जाच्या बाबतीत योग्य नसला तरी त्याला चकाकी राहते. त्यामुळे माहितीअभावी ग्राहकांची या संत्र्याला पसंती आणि मागणी देखील असते, असे व्यापारी सांगतात. परिणामी, नागपुरी संत्र्याला देशांतर्गत बाजारपेठेत दरासाठी संघर्ष करावा लागतो, अशी स्थिती आहे. बांगलादेश हा एकमेव नागपुरी संत्र्याचा आयातदार आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत बांगलादेशकडून सातत्याने आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्याचा निर्यातीवर मोठा परिणाम नोंदविण्यात आला आहे.

श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आयात शुल्क कमी असल्याने निर्यात दोन लाख टनांपेक्षा अधिक होती. उर्वरित संत्रा फळांना देशांतर्गत बाजारपेठेत चांगला दर मिळत होता. त्यानंतरच्या काळात आयात शुल्क २२ टकांवरून ८८ आणि आता १०१ टका करण्यात आले आहे.

बांगलादेशी एक टका भारतीय रुपयांत ७१ पैसे होतो. त्यानुसार आयात शुल्क प्रति किलो ७१ रुपयांवर पोहोचले आहे. याचा परिणाम संत्र्याच्या निर्यातीवर होणार असल्याने उत्पादकांच्या अडचणीत वाढीची शक्‍यता वर्तविली जात आहे. यापूर्वी आयात शुल्कात वाढीच्या परिणामी निर्यात २ लाख टनांवरून २५ हजार टनांवर आली होती. त्यात पुन्हा घट झाल्यास चिंतेचा विषय होणार आहे.

बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केली आहे. याचा थेट परिणाम उत्पादक आणि निर्यातदारांवर होणार आहे. निर्यातकांच्या अस्तित्वाचे धोरण ठरविण्यासाठी या मुद्यावर सोमवारी (ता. १५) निर्यातदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.
- सोनू खान, संत्रा निर्यातदार, वरुड, अमरावती
आयात शुल्काचा मुद्दा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने मांडण्यात आला. त्यांनी वाणिज्य मंत्र्यांशी या बाबत पत्रव्यवहार केला. मात्र गेल्या पाच वर्षांत यावर तोडगा निघू शकला नाही. सरकारने याप्रश्‍नी हस्तक्षेप करावा, आयात निर्यात धोरण ठरविणे हा बांगलादेश सरकारचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्यामुळे भारत सरकारची हतबलता दिसते. तरीसुद्धा राजकीय मुत्सद्देगिरीचा वापर करीत यावर तोडगा शक्‍य आहे.
- रमेश जिचकार, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

Seeds Testing Demonstration: कारंब्यात सोयाबीन, तूर बियाणे उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक

Water Crisis: पाणीटंचाईच्या महाडला झळा

DAP Fertilizers Alternative: शेतकऱ्यांनी ‘डीएपी’ खताला पर्यायी खतांचा वापर करावा

SCROLL FOR NEXT