Sowing Season : इगतपुरी तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर सर्वच गाव- वाडया पाड्यांमध्ये भात लागवडीच्या (आवणी) कामांना वेग आला आहे. .तालुक्यात १२४ गावे आणि १५० हून अधिक वाडे-पाडे आहेत. दरवर्षी ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. तालुक्यात एकेकाळी मोठ्या संख्येने मजूर उपलब्ध व्हायचे, मात्र काही वर्षापासून तालुक्यात उद्योगधंदे नसल्यामुळे शेकडो मजूर शहरी भागातील कारखान्यात काम करतात. त्यामुळे पावसाळ्यात मिळणारे मजूर अनेक वर्षापासून उपलब्धच होत नाही..Maharashtra Agriculture Sowing: राज्यात ३९ टक्के पेरण्या पूर्ण.यंदा तरही समस्या तीव्रतेने जाणवत आहे. एकाचवेळी कामे सुरू झाल्याने मजुरांना किमान साडेतीनशे ते चारशे रुपये रोज द्यावा लागत आहे. त्यामुळे खर्डी, शहापुर, कसारा, आसनगाव, उंबरमाळी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागत आहे..Kharif Sowing: विदर्भात पावसाअभावी पेरण्या रखडल्या.मजुरांची टंचाईमुळे एका शेतमजुराला दररोज ३५० ते ४०० रुपये आणि अधिक जेवणाचा खर्च द्यावा लागत आहे.या सर्व कारणांमुळे शेतीव्यवसाय जास्त कष्टाचा आणि खर्चिक झाला आहे. त्यामुळे भातशेती करणे परवडत नसल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात. भातशेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी पेरभात शेतीला पसंती दिली आहे..यावर्षी ३० ते ४० टक्के पेरभात शेती केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान काही शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक शेतीकडे वळला आहे. तालुक्यात एसआरटी भातशेती सुमारे ५० एकर तर मल्चिंग सहा ते सात एकर क्षेत्रात केली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.