Orange Processing : सव्वातीन लाख टन संत्र्यावर करणार प्रक्रिया

Rahul Satpute : पूर्वीचे ३३ व नव्याने प्रस्तावित १२ याप्रमाणे ४५ प्रकल्पांच्या माध्यमातून ५० टक्‍के फळांवर प्रक्रिया करणे याद्वारे शक्‍य होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली.
Orange Farming
Orange FarmingAgrowon

Amravati News : अमरावती जिल्ह्यात ७९,२१३ हेक्‍टरवर संत्रा असून हंगामी उत्पादकता सहा लाख ७३ हजार ५२० टन आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पूर्वीचे ३३ व नव्याने प्रस्तावित १२ याप्रमाणे ४५ प्रकल्पांच्या माध्यमातून ५० टक्‍के फळांवर प्रक्रिया करणे याद्वारे शक्‍य होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली.

प्रस्तावित शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रकल्प आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये, हार्टिगो शेतकरी उत्पादक कंपनी (कविठा बु., अचलपूर) प्रकल्पाची किंमत २३९.२१ लाख रुपये आहे. श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचा (वरुड) प्रकल्प आराखडा ३३१.७३ लाख रुपयांचा आहे. कृषी प्रेन्यूवर कंपनी (हिवरखेड, मोर्शी) या कंपनीचा प्रकल्प ३६२.६९ लाख रुपयांचा आहे.

Orange Farming
Orange Subsidy : मोसंबीच्या बागांसाठी हेक्टरी लाखाचे अनुदान द्या

ऑरेजव्हिले (वरुड) या कंपनीने ३७४.३ लाख रुपयांचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. कृष्णार्पण शेतकरी कंपनी (अंबाडा, मोर्शी) या कंपनीचा प्रकल्प २५२.४ लाखांचा आहे. समृद्धा ॲग्रोटेक कंपनी (वलगाव)द्वारे ४६६.९४ लाख, गजलक्ष्मी ॲग्रो कंपनी (चौसाळा, अंजनगाव)द्वारे २५६.१७, जिजाऊ कल्टिव्हेटर कंपनी (चौसाळा, अंजनगाव)द्वारे ३७५.९५, हायर्ड हॅन्ड ॲग्रो कंपनी (पुसला, वरुड)द्वारे ३८८.७८, प्रहारशक्‍ती कंपनीचा (रायपूरा, अचलपूर) २३०.७३, एलएमके कंपनी (चांदूरबाजार)द्वारे ३५४.८, टॅगी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी (अमरावती)द्वारे २८९.९ लाख रुपयांचा प्रकल्प आराखडा सादर करण्यात आला आहे.

Orange Farming
Orange Variety : नागपुरी संत्र्याचा दर्जा सुधारण्यासाठी ९ कोटी

या प्रकल्पांच्या माध्यमातून प्राथमिकस्तरावर स्वच्छता, प्रतवारीची प्रक्रिया केली जाणार असल्याचे राहुल सातपुते यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला सुमारे ९६ हजार संत्रा फळांवर प्राथमिक प्रक्रियेचे काम होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात ३३ प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यांची वार्षिक प्रक्रिया क्षमता २ लाख २८ हजार इतकी आहे.

जिल्ह्यातील सद्यःस्थितीतील क्षमता व प्रस्तावित प्रकल्पांचा विचार केल्यास जिल्ह्याच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्‍के संत्रा फळांवर प्राथमिक प्रक्रिया करणे येत्या एक वर्षात शक्‍य होणार आहे. जर २० टक्‍के निरुपयोगी ठरणाऱ्या फळांचा विचार केल्यास ६२ टक्‍क्यांपेक्षा जास्त संत्रा फळांवर प्राथमिक प्रक्रिया करता येईल. संत्रा स्वच्छता, प्रतवारीची आणि वॅक्‍स कोटिंग अशा प्राथमिक प्रक्रियेमुळे फळांची गुणवत्ता आणि टिकवणक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com