Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : कांदा बाजारावर सरकारी धोरणांचा दबाव कायम

Onion Rate : देशातील बाजारात कांद्याचे भाव अद्याप दबावातच दिसत आहेत. निर्यातशुल्क लागू करण्याआधीच्या पातळीवर कांदा अद्याप पोहोचला नाही.

Team Agrowon

Pune News : देशातील बाजारात कांद्याचे भाव अद्याप दबावातच दिसत आहेत. निर्यातशुल्क लागू करण्याआधीच्या पातळीवर कांदा अद्याप पोहोचला नाही. सरकारच्या धोरणांचा कांदा बाजारावर दबाव दिसतोय. पण पुढील काळात बाजारातील कांदा आवक कमी होत जाऊन दरात सुधारणा होईल, असा अंदाज आहे. पण सरकारच्या धोरणांचाही दबाव बाजारावर राहण्याची शक्यता आहे.

सध्या कांद्याचे भाव दबावातच आहेत. कांद्याला सध्या बाजारात १ हजार ५०० ते २ हजार रुपायांपर्यंत भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक मागील १५ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घटली आहे. पण बाजारातील आवक कमी असूनही केवळ सरकारच्या दबावामुळे बाजार स्थिर आहे.

बाजारातील आवक पाहता दरात आतापर्यंत चांगली वाढ होणे अपेक्षित होते. पण भाव दबावातच आहेत. सरकारने कांद्यावर निर्यातशुल्क लावण्याआधी भाव ज्या पातळीवर होते त्या पातळीवरही आतापर्यंत बाजार पोहोचला नाही. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.

देशातील बाजारात कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा काहीसे वाढल्यानंतर सरकारने १९ ऑगस्ट रोजी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले होते. सरकारने शुल्क लावले त्या वेळी निर्यातक्षम कांद्याचा भाव २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते. पण निर्यातशुल्क लावल्यानंतर हाच भाव २ हजारांवर आला.

पण मागील महिनाभरात कांद्याची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. पण सरकार शेतीमालाच्या भाववाढीविषयी आक्रमक भूमिका घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाव वाढू द्यायचे नाहीत, असा सरकारचा पवित्रा असल्याचे दिसते. याचा थेट दबाव कांदा बाजारावर आला. यामुळे कांदा भाव दबावातच आहेत.

मागणीपेक्षा पुरवठा खूपच कमी राहण्याची शक्यता

यंदा चाळीतील कांद्याचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात कमी आहे. तसेच खरिपातील कांदा लागवडीही ३० ते ४० टक्क्यांनी घटल्या आहेत. महाराष्ट्रात खरिपातील लागवडी ४० टक्क्यांनी घटल्या आहेत. तर दुष्काळी स्थितीचा फटका खरीप कांद्याला बसत आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारातील कांदा आवक आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामुळे कांद्याच्या भावातही सुधारणा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण सणासुदीच्या काळात आणि निवडणुकांच्या काळात कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करेल, याविषयी दुमत नाही. पण पुढील काळात कांद्याच्या मागणीपेक्षा पुरवठा खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही काळानंतर सरकारलाही भाव नियंत्रणात आणता येणार नाहीत, असे दिसते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT