Turmeric Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : नांदेडला नव्या हळदीला कमाल १५३७७ रुपयांचा दर

Turmeric Rate : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत नवा मोंढा बाजारात सध्या नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत नवा मोंढा बाजारात सध्या नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. २२) नवा मोंढा बाजारात जवळा पांचाळ (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील अहेमद शेख या शेतकऱ्याच्या हळदीला कमाल १५ हजार ३७७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सध्या दररोज दीड हजार ते दोन हजार क्विंटल हळदीची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यासह शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी हदळीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. ही हळद नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजार समितीत विक्रीसाठी आणली जाते. या दोन बाजार समितीला सध्या हळदीच्या व्यापारावर उत्पन्न मिळते. दरम्यान सध्या बाजारात नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे.

गुरुवारी (ता. २२) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात दीड हजार क्विंटल हळदीची आवक झाली. यात कमाल १५ हजार ३७७, किमान १० हजार ७७७ तर सरासरी १३ हजार ७७७ रुपये दर मिळाला. नवा मोंढा बाजारातील आशा ट्रेडिंग यांच्याकडे जवळा पांचाळ (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील अहेमद शेख या शेतकऱ्याने हळद विक्रीसाठी आणली होती.

या हळदीला कमाल १५ हजार ३७७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ही हळद श्री ठक्कर ब्रदर्स यांनी खरेदी केली. दरम्यान नांदेड कृषी उत्पन बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात सध्या शेतीमालाची आवक सर्वसाधारण आहे. नवीन गहू, हळद, ज्वारी, हरभरा या शेतीमालाची आवक सुरू झाली आहे.

नांदेड बाजारातील गुरुवारचे (ता. २२) शेतीमालाचे दर

शेतमाल....कमाल दर.....किमान दर.....सरासरी दर

हळद.......१५,३७७.......१०,७७७........१३,७७७

सोयाबीन..०४,४८०.......०४,०५०........०४,४२०

गहू.........०२,७६०.......०२,१००........०२,५००

तूर.........०९,६५०.......०९,०००........०९,४००

ज्वारी......०२,८४०......०२,५२०........०२,६००

हरभरा......०५,७७०......०५,६००........०५,७००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT