Anganwadi Allowance Hike: अंगणवाडी सेविका व मदतनीसांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच दिले. यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. .यासंदर्भात कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर मंत्रालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी या निकषांच्या आधारे प्रोत्साहन भत्ता निश्चित करण्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. .Anganwadi Workers: अंगणवाडी सेविका, मदतनीसांना २ हजार रुपयांची भाऊबीज भेट.राज्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे तसेच गर्भवती मातांचे पोषण आणि आरोग्य यांची काळजी घेण्यासाठी राज्यातील १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० मदतनीस कार्यरत आहेत. त्यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार सेविकांना प्रतिमहा १,५०० ते २,००० रुपये, तर मदतनीसांना ५०० ते १,००० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. हा प्रोत्साहन भत्ता १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आला आहे..Anganwadi Employee Benefits: अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू.अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील लहान बालके, गरोदर महिला व स्तनदा मातांच्या पोषणाची आणि आरोग्याची काळजी घेण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा मोलाचा वाटा आहे. .१ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये अधिक सुधारणा करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकारने सकारात्मक दर्शवली आहे. अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत तसेच सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी याआधी स्पष्ट केले होते. .दिवाळीपूर्वीच २ हजारांची भाऊबीज भेट मिळाली अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यंदाची भाऊबीज भेट दिवाळीपूर्वीच थेट बँक खात्यात अदा करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रत्येकी २ हजार रुपयांची भाऊबीज भेट मिळाली आहे. त्यांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.