Turmeric Market : राजापुरी हळदीला १३ हजार ते २२ हजार रुपये दर

Turmeric Rate : हळदीचा हंगाम सुरू झाला असून, सध्या सांगली बाजार समितीत राजापुरी हळदीची ५ ते ६ हजार पोती, तर परपेठीची ७०० ते १००० पोत्यांची आवक होत आहे.
Turmeric
Turmeric Agrowon
Published on
Updated on

Sangli News : हळदीचा हंगाम सुरू झाला असून, सध्या सांगली बाजार समितीत राजापुरी हळदीची ५ ते ६ हजार पोती, तर परपेठीची ७०० ते १००० पोत्यांची आवक होत आहे. बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागल्याने दिवसातून दोन वेळा सौदे सुरू केले आहेत.

Turmeric
Processing on Turmeric : सुधारित पद्धतीने हळदीवर प्रक्रिया

गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर टिकून आहेत. राजापुरी हळदीला प्रतवारीनुसार प्रति क्विंटल १३ हजार ते २२ हजार रुपये असा दर मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरुवातीला दर चांगले मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

सांगली बाजार समिती हळद बाजारपेठ ही देशात प्रसिद्ध आहे. बाजार समितीत नव्या हळदीचे सौदे सुरू झाले आहेत. राजापुरी म्हणजे स्थानिक हळदीची आवक होऊ लागली आहे. सध्या बाजार समितीत दररोज ५ ते ६ हजार पोत्यांची (एक पोते ५० किलोचे) आवक होत आहे.

राजापुरीला हळदीला १३ हजार ते २२ रुपये असा दर मिळत आहे. परपेठ म्हणजे इतर राज्य जिल्ह्यांतून येणाऱ्या हळदीची ७०० ते १००० पोत्यांची आवक सुरू आहे. हळदीच्या प्रतवारी आणि दर्जेनुसार प्रति क्विंटल ९५०० ते १५८०० हजार, तर सरासरी १०८०० रुपये असा दर मिळतो आहे.

Turmeric
Turmeric Polishing : हळदीचे पॉलिश अन् प्रतवारी

सध्या सांगली जिल्ह्यातील हळद बाजार समितीत सौद्यासाठी येऊ लागली आहे. त्याचबरोबर सातारा, निजामाबाद, जळगाव, नांदडे या भागांतूनही हळद विक्रीसाठी येऊ लागली आहे. त्यामुळे राजापुरी हळदीचे सौदे सकाळी, तर परपेठ हळदीचे सौदे सायंकाळी असे दिवसांतून दोन वेळा सौदे होऊ लागले आहेत.

बाजार समितीत नव्या हळदीची आवक वाढू लागली असून, उठावही चांगला होत आहे. यंदाच्या हंगामापासूनच हळदीच्या दरात तेजी असून, भविष्यात देखील हळदीचे दर चढे राहतील, अशी शक्यता हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रति क्विंटल)

पावडर क्वालिटी ः १४५०० ते १५५००

कणी ः १३२०० ते १४०००

मध्यम ः १६५०० ते १८५००

लगडी ः १८००० ते २२०००

मुक्रा गठ्ठा ः १५५०० ते १६०००

गठ्ठा क्र. २ ः १३००० ते १४५००

बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली आहे. बाजारात हळदीला मागणी असून उठावही होत आहे. त्यामुळे या वर्षी हळदीचे दर चांगले आहेत.
- गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली
सांगली बाजारपेठेत दर्जेदार हळदीची आवक होते. त्यामुळे स्पर्धेतून हळदीचे दर चांगले मिळतात. बाजारात आवक वाढल्याने दोन वेळा सौदे सुरू केले आहेत.
- सुजय शिंदे, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com