Turmeric Harvesting : वाशीममध्ये हळद काढणी सुरू

Turmeric Production : सध्या काढणी झालेल्या क्षेत्रात जिल्ह्यात १० पासून १५ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादकता येत आहे.
Turmeric
TurmericAgrowon

Washim News : हळदीला मागील दोन-तीन वर्षांत दर चांगले मिळत असल्याने जिल्ह्यातील उत्पादक लागवडीत सातत्य टिकवून आहेत. या हंगामातील हळद काढणीला सुरुवात झाली आहे. बाजारपेठांत हळदीचा प्रतिक्विंटल १३ ते १४ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दुसरीकडे सरासरी उत्पादकता घटल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या काढणी झालेल्या क्षेत्रात जिल्ह्यात १० पासून १५ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादकता येत आहे.

वाशीम जिल्ह्यात हळदीची सुमारे ४ ते ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होते. मागील दोन-तीन हंगामांत हळदीने चांगले दर मिळवून दिले. तत्पूर्वी हळददर पाच ते सात हजारांदरम्यान घसरल्याने उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागला. आता नफा-तोट्याचे गणित थोडे सुधारले आहे. मात्र, वातावरण बदलाचा फटका हळदीला बसत आहे.

Turmeric
Turmeric Harvesting : हळदीची ३० टक्के काढणी उरकली ; उत्पादनात येतेय १५ ते २० टक्के घट

पावसातील खंड, जमिनीत हुमणीचा प्रादुर्भाव व इतर कीडरोगांमुळे उत्पादकतेवर परिणाम होत आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी एकरी २५ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादकता काढण्यात सातत्य टिकवून आहेत. यंदाची परिस्थिती थोडी अवघड झाली आहे. नैसर्गिक बदलांचा फटका उत्पादनावर झाला. विहिरीतील पाणी कमी झालेल्या व जमीन हलकी असलेल्या क्षेत्रात हळद काढणीने वेग घेतला. प्रामुख्याने रिसोड तालुक्यात हळद काढणीच्या कामाला वेग आला आहे. हळदीच्या उत्पादकतेत कमालीची घट दिसून येत आहे.

यावर्षी रिसोड तालुक्यात हळदीचा पेरा वाढला होता. सध्या काढणी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. हळद पिकाला जवळपास दहा महिन्यांचा कालावधी लागतो. या पिकाच्या व्यवस्थापनाचा खर्च ७० हजार ते एक लाखांदरम्यान पोहोचलेला आहे. आता काढणीचा खर्चच १८ ते २० हजारांवर पोहोचला आहे.

Turmeric
Turmeric Market : राजापुरी हळदीला १३ हजार ते २२ हजार रुपये दर

हळद काढणीच्या दरात वाढ

हळदीचा दर या वेळी सध्या १३ ते १४ हजारांदरम्यान आहे. सार्वत्रिक उत्पादकतेत झालेली घट आणि मागणीचा विचार करता दर आणखी वर जाईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दर चांगले असताना उत्पादकतेत २५ ते ३० टक्य्यांपर्यंत घट दिसून येत असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे दर वाढले तरी तितकासा फायदा सरसकट होईल, असे दिसत नाही.

त्यातच हळद काढणीचा दर वाढला. आता ट्रॅक्टरने बेड फोडण्यासाठी एकरी १८०० ते २००० रुपये लागतात. त्यानंतर उघडे पडलेले हळदीचे कंद वेचण्याची मजुरी १४ ते १५ हजारांपर्यंत जाते. शिल्लक राहिलेले कंद (सरवा) वेचणीसाठी पुन्हा दीड-दोन हजार लागतात. हळद लागवडीपासून माल घरी येईपर्यंतचा खर्च ७० हजार ते एक लाखापर्यंत पोहोचला आहे.

गेल्या तीन चार वर्षात हळदीचा दर पाच ते सहा हजारांदरम्यान राहल्याने उत्पादकांचा खर्चाचा ताळमेळ हुकला होता. आता दर चांगले मिळत असल्याने समाधानाची बाब आहे. दुसरीकडे खर्चाचे प्रमाण वाढत असल्याने सामान्य उत्पादकता मिळणाऱ्या शेतकऱ्याचे नफ्याचे प्रमाणसुद्धा कमी झाल्याची वस्तुस्थिती मान्य करावी लागेल.
डॉ. गजानन ढवळे, हळद उत्पादक, शिरपूर जैन, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com