Jeera Agrowon
मार्केट ट्रेंड

Jeera Market Rate : जिऱ्याचा भाव क्विंटलला ५५ हजारांवर

Team Agrowon

कापूस दर काहीसे नरमले

1. कापूस दरातील चढ उतार सुरुच आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे ८०.३५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील कापूस वायदे दुपारपर्यंत ३०० रुपयांनी कमी होऊन ५७ हजार १८० रुपयांवर पोचले होते. तसेच बाजार समित्यांमधील दरातही काही ठिकाणी नरमाई दिसून आली. सरासरी दरपातळी आज ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रपयांच्या दरम्यान होती. कापूस दरात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनचा बाजार स्थिर

2. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीन दर स्थिर आहेत. सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे आज १३.६५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३९७ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशात मात्र सोयाबीनचा भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. एनसीडीईएक्सचे स्पाॅटचे भाव वेगवेगळ्या केंद्रांवर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये होते. सोयापेंड तसेच सोयातेलाचा बाजार बघता सोयाबीनचे भाव स्थिर राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटो भावातील तेजी कायम

3. देशातील बाजारात टोमॅटो दरातील तेजी टिकून आहे. बाजारातील आवक कमी होऊन मागणी कायम असल्याने दर वाढले आहेत. आज देशभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोचा भाव ६ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होता. टोमॅटोचा पुरवठा लगेच वाढण्याचा अंदाज कमीच आहे. त्यामुळे टोमॅटो दरात आलेली तेजी पुढील काही काळ टिकून राहू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

शेवग्याला चांगला उठाव

4. राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सध्या शेवग्याची आवक कमी आहे. तर दुसरीकडे शेवग्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे शेवग्याच्या भावातील तेजी कायम आहे. शेवग्याचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. पुढील काही दिवस शेवग्याची आवक आणि भाव कायम दिसू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

जिऱ्याचा भाव क्विंटलला ५५ हजारांवर

5. यंदा जिरा चांगलाच भाव खात आहे. सध्या देशात जिऱ्याचा स्टाॅक खूपच कमी आहे. तर देशांतर्गत आणि निर्यातीसाठी जिऱ्याला चांगली मागणी आहे. त्यातच मागील दोन आठवड्यांमध्ये राजस्थानमधील जिरा उत्पादक महत्वाच्या अलवर, जैसलमेर, जयपूर, बिकानेर, भीलवाडा आणि बाडमेर या राज्यांमध्ये पाऊस झाला. तसेच गुजरातमधील जिरा उत्पादक भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली. याचा जिरा पिकाला फटका बसला. यामुळे जिऱ्याचे भाव तेजीत आहेत.

देशात यंदा जिऱ्याची मागणी ४ लाख ५० हजार ते ५ लाख टनांपर्यंत राहू शकते. तर यंदा जिऱ्याचा पुरवठा साडेतीन ते चार लाख टनांपर्यंत होऊ शकतो, असा अंदाज आहे. या सर्व कारणांमुळे जिऱ्याचे भाव राजस्थान आणि गुजरातमधील महत्वाच्या बाजारांमध्ये सरासरी ५५ हजार हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

काही व्यापारी आणि स्टाॅकीस्ट नफावसुली करत असल्याने दरात दोन ते तीन हजारांचे चढ उतार येतात. पण बाजार गेल्या महिनाभरापासून ५० हजारांपेक्षा जास्त आहे. यंदा देशातील उत्पादन घटले.

सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर जिरा उत्पादक देशांमध्ये उत्पादन कमी झाले. त्यामुळे भारताकडे मागणी आहे. पण देशातही पुरवठा कमी असल्याने जिऱ्याचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT