Sugarcane Cultivation Parbhani: परभणी : जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ३० हजार ८२ हेक्टरवर ऊस लागवड झाली. २०२३-२४ मधील २२ हजार २७३ हेक्टरच्या तुलनेत ७ हजार ८०९ हेक्टरने वाढ झाली आहे. परंतु अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादनात ४६ हजार ८६८ टनांवर घट अपेक्षित आहे. त्यामुळे यंदाच्या (२०२५-२६) गाळप हंगामात साखर कारखान्यांना १५ लाख २५ हजार टन ऊस उपलब्ध होऊ शकेल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..परभणी जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली जाते. गतवर्षी (२०२४-२५) जायकवाड़ीसह, येलदरी-सिद्धेश्वर, निम्म दुधना, माजलगाव या मोठ्या प्रकल्पासह मध्यम तसेच लघु प्रकल्पांमध्ये सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली. परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ तालु्क्यातील ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली. परंतु मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील ऊस लागवडीत घट झाली. यंदा जिल्ह्यातील पूर्व हंगामी १४ हजार ३८ हेक्टर,सुरु ९ हजार ४५२ हेक्टर, ऊस खोडवा ६ हजार ५९१ हेक्टर असा एकूण ३० हजार ८२ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकेल. २०२३-२४ मध्ये परभणी तालुक्यात २२८४.५० हेक्टर, जिंतूर तालुक्यात १६२.९५ हेक्टर,सेलू तालुक्यात ३३३.० हेक्टर, मानवत तालुक्यात १०२१.२० हेक्टर, पाथरी तालुक्यात ७१८६ हेक्टर, सोनपेठ तालुक्यात १८७५ हेक्टर, गंगाखेड तालुक्यात २२१८ हेक्टर, पालम तालुक्यात १४४० हेक्टर, पूर्णा तालुक्यात ५७५३ हेक्टर अशी एकूण २२ हजार २७३ हेक्टर ऊस लागवड होती. त्यापासून २०२४-२५ च्या हंगामात १५ लाख ७२ हजार २७६ टन ऊस उत्पादन मिळाले होते..Sugarcane Price: साखर कारखान्यांच्या नफ्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा, काय आहे उसाचा रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला?.परभणी जिल्हा २०२५-२६ मध्ये गाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका ऊस लागवड क्षेत्र उत्पादन टनपरभणी ३६६१ १८५८१५जिंतूर ५०० ३०३६०सेलू ८३८ ६७८६७मानवत ७३७.८० ४११४१पाथरी १३८०२ १०३७५९५सोनपेठ २३९३ ६१४२८गंगाखेड १८८० ११२१०पालम ११४० ६२७९४पूर्णा ५१३० ३६३२३६.Sugarcane Harvest: ऊस तोडणीचे शास्त्रीय नियोजन.परभणी जिल्हा २०२५-२६ ऊस उत्पादकता स्थिती (टनामध्ये)तालुका पूर्व हंगामी सुरु.परभणी ५१ ४७जिंतूर ६५ ६०सेलू ६६.८० ६४.२०मानवत ५४.८० ७१पाथरी ८० ७५सोनपेठ ६२.७२ ७०.९०गंगाखेड ६५ ६०पालम ६२ ५८पूर्णा ७५ ७०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.