Paddy Crop Damage: पाली : रायगड जिल्ह्यात भातशेतीचे पावसाने नुकसान झाले आहे. अशातच आदिवासीबहुल भागातील नाचणी, वरी अशा नगदी पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. परिणामी, रब्बी हंगामासाठी लागणारे भांडवल नसल्याने बळीराजाला आर्थिक चणचण जाणवू लागली आहे..भातशेतीची कामे आटोपल्यावर शेतकरी शेतात कडधान्य लावतो. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान रब्बी हंगामाला सुरुवात होते. जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास बारा ते साडेपंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. मार्च-एप्रिलपर्यंत हा हंगाम चालतो; मात्र लांबलेल्या पावसामुळे कडधान्यांसाठीचे पूरक हवामान नसल्याने हंगाम संकटात आला आहे. काढणीअभावी भातपीक शेतात पडून आहे. .Paddy Crop Loss: सततच्या पावसाने भात पिकाचे नुकसान.तर डोंगर उतारावरील जमीन ओली असल्याने वरी, नाचणी लागवडीसाठी शेतकऱ्याला मशागत करणे अशक्य आहे. त्यामुळे कडधान्य लागवडीला उशीर होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, नोव्हेंबर उजाडला तरी अनेक भागांमध्ये पाऊस पडत असल्याने भातकापणीची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे यंदा भाताचे पीक वाया जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे. .Paddy Crop Damage: हळव्या भाताचे अतोनात नुकसान.कडधान्याची आवक कमी होण्याचा अंदाजजिल्ह्यात भातासह शेतीपूरक वाल, मूग, मटकी, तूर, चवळी अशी कडधान्यांची पिके घेतली जातात. तीन ते चार हजार हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. त्यानंतर मूग, मटकी, चवळी, तूर अशी कडधान्यांची लागवड होते; मात्र परतीच्या पावसामुळे शेतजमीन पाण्याखाली आहे. शेतात पाणी साचले असल्यामुळे कडधान्य पिकासाठी मशागत, लागवड करणे आता शक्य नाही. त्यामुळे यंदा कडधान्याची आवक कमी होण्याचा अंदाज आहे..घर खर्चाची चिंता सुधागड, श्रीवर्धन, खालापूर, तळा, म्हसळा, महाड, पोलादपूर, पेण, कर्जत अशा आदिवासीबहुल तालुक्यात वरी, नाचणीचे पीक आदिवासी मोठ्या प्रमाणात घेतात. हक्काची शेतजमीन नसल्याने भातलागवड करणे शक्य होत नाही. त्यामुळे माळरान किंवा वरकस जमिनीवर शेती होते. हाती आलेले पीक विकून दोन पैसे त्यांना मिळतात. या पैशांतून काही दिवसांचा घरखर्च चालतो; मात्र यंदा परतीच्या पावसाने मुक्काम वाढवल्याने जिल्ह्यातील आदिवासी बांधव पुरता हतबल झाला आहे.आंबा बागायतदार पावसाने धास्तावले श्रीवर्धन : अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील आंबा पीक घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर उजाडला तरी अजून मोहोर येण्यास सुरुवात झाली नसल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत..श्रीवर्धन तालुक्यात नारळ, रोठा सुपारी खालोखाल आंब्याचे पीक घेतले जाते. कोकणातील डोंगर उताराच्या जमिनी आंबा पिकास उपयुक्त आहेत. तालुक्यात १,९१० हेक्टर क्षेत्रात नव्वद टक्के हापूस, तर १० टक्के पायरी, केसरची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी सत्तेचाळीस हजार टन आंब्याचे उत्पादन तालुक्यात होते. साधारणपणे आक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते..कडधान्यांना पावसाचा फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे कडधान्य पिकाचा हंगाम जवळपास गेला आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.- शरद गोळे, अध्यक्ष, कृषीमित्र संघटना, सुधागड-पाली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.