Tur Market
Tur Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: तुरीच्या दरातील तेजी टिकेल का?

Team Agrowon

कापसातील नरमाई कायम

1. कापसाच्या भावातील नरमाई आजही कायम होती. कापसाला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केल्यानंतरही भाव दबावात आहेत. शेतकरीही कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात करत आहेत.

त्यामुळे कापसाचे भाव दबावात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. पण शेतकऱ्यांकडी कापसाचा स्टाॅक कमी होत आहे. त्यामुळे बाजारातील आवकही पुढील काळात कमी होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

सोयाबीनवर दबाव

2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयातेलाच्या दबावात आहेत. सोयापेंडचे वायदे आजही १३.९४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयातेलाचे वायदे ४९.३३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे दर दबावातच आहेत.

सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळतोय. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

हिरवी मिरची तेजीत

3. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. अवकाळी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे आवकेवर परिणाम होत आहे. सध्या राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर बाजारात आवक सध्या काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर तेजीत आहेत. सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. मिरचीचे दर पुढील काळातही तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

बाजरीला चांगला उठाव

4. बाजरीला सध्या चांगला भाव मिळत आहे. बाजारातील बाजरी आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. पण दुसरीकडे बाजरीला चांगला उठाव आहे. सध्या बाजरीला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

यंदा देशातील बाजरी उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे बाजारीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे. परिणामी बाजरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असाही अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

तुरीच्या दरातील तेजी टिकेल का?

5. बाजारात सध्या तुरीला गरजेप्रमाणे उठाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने दरात तेजी आहे.

देशातील बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार १०० रुपयांचा भाव मिळतोय. तूर डाळीचे भाव अनेक बाजारात सध्या १३० रुपये प्रतिकिलोवर आहेत.

पुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादरांना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्यास सांगितले.

चुकीची माहिती दिल्यास कारवाईचाही इशारा दिला. तसेच तुरीचे भाव कमी केले नाही तर सरकारचं आयातीचा विचार करेल, असाही इशारा देण्यात आला. पण आयात तुरीचे भावही जास्त आहेत. सध्या म्यानमारमध्ये तुरीची उपलब्धता जास्त आहे.

पण येथून तूर आयात करायची म्हटल्यास प्रतिक्विंटल ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव पडत आहे. यामुळे सरकारला स्वस्त तूर लगेच मिळण्याची शक्यता कमीच आहे.

त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. तुरीच्या दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी वक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Development : पंचायत राज रचनेतून ग्राम विकासाला चालना

Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’चा बोजा ग्राहकांच्या खांद्यावरच

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला वळवाचा तडाखा, पूर्व, दक्षिण भागात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT