tur rate agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Rate : तुरीचे दर विक्रमी टप्पा गाठतील का?

देशात तुरीची लागवड आतापर्यंत १०.४२ टक्क्यांनी कमी झाली. तर सणांच्या पार्श्वभुमीवर तुरीला मागणी वाढली. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. परंतु पुढील काही दिवसांत तुरीची आयात वाढेल.

टीम ॲग्रोवन

राज्यात केळीचे दर नरमले

श्रावण मासामुळे फळांना मागणी वाढलीये. त्यात केळीला अधिक पसंती मिळतेय. केळी उत्पादकांना श्रावण महिन्यात चांगला दर मिळतो. शेतकरीही त्यादृष्टीनं नियोजन करतात. राज्यात केळीचे दर सध्या नरमले आहेत. केळीला सरासरी १२०० ते १५०० रुपये दर मिळतोय. हाच दर मागील आठवड्यात १७०० ते २२०० रुपये होता. खानदेशात शेतकऱ्यांना १००० ते १२०० रुपयांपर्यंतच दर मिळतोय. तर मराठवाडा आणि विदर्भात १२०० ते १५०० रुपयानं केळी विकली जातेय. सध्या दर कमी झाले तरीही शेतकऱ्यांनी केळीचे सौदे वाढवले. श्रावणामुळं केळीचा हा भाव टिकून राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

मागणी वाढल्यानं वांगी दराला आधार

जुलै महिन्यात सलग १० ते १२ दिवस झालेल्या पावसानं भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान केलं. तर श्रावण मासामुळं भाजीपाल्याला मागणी वाढली. त्यामुळं इतर भाजीपाल्याप्रमाणं वांगी दरातही सुधारणा झाली. मागील काही दिवसांत वांग्याचे दर क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयाने सुधारले. सध्या राज्यातील विविध बाजारांमध्ये ३ हजार ते ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पण श्रावण महिन्याचा विचार करता मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा दर कमीच आहे, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. तर बाजारात पुढील काही दिवस वांगी भाव खाईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

हरभरा दरात मोठ्या तेजीची शक्यता कमीच

देशात यंदा हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन झालं. तसचं नाफेडकडंही हरभऱ्याचा मोठा साठा आहे. पुढील तीन महिने सणांचे मानले जातात. या काळात हरभऱ्याला मागणी वाढते. मात्र सरकार आपला साठा केव्हाही बाजारात आणू शकते. त्यामुळं व्यापारी किंवा स्टाॅकिस्ट दिर्घकालीन व्यवहार करायला इच्छूक नाहीत. परिणामी हरभरा दर अद्यापही दबावात आहेत. सध्या राज्यातील बाजारात हरभऱ्याला ४ हजार ३०० ते ५ हजार रुपये सरासरी दर मिळतोय. तसंच पुढील काळात हरभरा दरात मोठ्या तेजीची शक्यता नाही. दर १०० ते २०० रुपयांनी सुधारू शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

मका दर टिकून राहण्याचा अंदाज

देशात अनेक राज्यांतील खरीप मका लागवडी पूर्ण झाल्या. बहुतेक भागांत मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. यंदा मका लागवड एक टक्क्याने घटली. तर महत्वाच्या मका उत्पादक राज्यांमध्ये पिकावर लष्करी अळी आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. पावसानंही नुकसान होतंय. त्यामुळं उत्पादनाला फटका बसू शकतो. तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात मका तेजीत आहे. या कारणांमुळं देशातही मक्याचे दर मजबूत स्थितीत आहेत. राज्याच्या महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये मक्याला सध्या सरासरी २३०० ते २६०० रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलीये.

तुरीचे दर विक्रमी टप्पा गाठतील का?

देशात सध्या तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. तसंच देशातील तूर लागवड (Tur Cultivarion) यंदा साडेदहा टक्क्यांनी कमी राहिली. तसचं सततच्या पावसानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात तुरीचं मोठं नुकसान (Tur Crop Damage) झालं. त्यामुळं उत्पादनात (Tur Production) घट येण्याचा अंदाज व्यक्त होतोय. तर दुसरीकडं सणांमुळं मागणी वाढली. पुढील काळात मागणी आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं तुरीच्या दरात मोठी तेजी आली. मात्र सध्या देशातील तुरीचा साठा आणि पुढील काळातील होणारी आयात लक्षात घेता दर जास्त वाढण्याची शक्यता नाही, असं जाणकारांनी सांगितलं. बर्मा या देशानं आपल्या चलनाचं अवमूल्यान केलं. त्यामुळं बर्मातून येणारं कडधान्य तसचं तूर स्वस्त होईल.

सध्या बर्माची तूर सरासरी ८ हजार रुपये प्रतिक्विंटलनं आयात होतेय. तर आफ्रिकी देशांमधूनही या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्यात तूर येईल. म्हणजेच देशात डिसेंबरमध्ये नवीन तूर आवक होईपर्यंत गरजेएवढी तूर उपलब्ध असेल. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट खरेदी करताना दिसत नाहीत. सध्याच्या तेजीत व्यापारी केलेला स्टाॅक बाजारात आणत आहेत. तसचं स्टाॅकिस्ट आणि व्यापारी यांनी या दरात आपला स्टाॅक रिकामा करून नफावसूली करण्याचं आवाहन बाजारात केलं जातंय. म्हणजेच सध्याच्या दरात फार वाढ होण्याची अपेक्षा नाही. सध्या बाजारात तुरीला गुणवत्तेप्रमाणं ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. काही बाजारात तुरीनं ८ हजार ४०० रुपयांचाही टप्पा गाठलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT