Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, केळी आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनमध्ये चढ उतार आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चढ उतार सुरु आहेत. कालच्या तुलनेत सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज काहिशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १०.१८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनमध्ये चढ उतार आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चढ उतार सुरु आहेत. कालच्या तुलनेत सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज काहिशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १०.१८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्यात चढ उतार सुरु 

कांदा भावात मागील तीन दिवसांपासून काहीसे चढ उतार दिसत आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य काढले आणि निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याच्या भावात चांगली सुधारणा झाली होती. पण त्यानंतर कांद्याच्या भावात पुन्हा चढ उतार सुरु झाले. अनेक बाजारात कांद्याचा भाव क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढला होता. पण सरासरी भावपातळी आजही ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान अनेक बाजारात होता. कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

गव्हाच्या भावाला आधार

गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे. सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत. पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो. त्यातच सरकारची गहू विक्रीही कमी झाली आहे. यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत. गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून १०० ते १५० रुपयांनी वाढला आहे. सध्या गव्हाचा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.   

केळीला उठाव कायम 

बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे. केळीला गेले महिनाभर मागणी टिकून होती. सध्या गणेशोत्सवामुळे भावही चांगले आहेत. तर यापुढे नवरात्रीमुळेही चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. परिणामी केळीला सध्या १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT