Agrowon Podcast : गव्हाचे भाव तेजीत; कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांचे काय आहेत दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, उडीद आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही कापसाचे भाव २०० रुपयांनी वाढली होते.

देशातील वायदे आज दुपारपर्यंत ५८ हजार २०० रुपयांवर होते. दुसरीकडे बाजार समित्यांमधील आवक काल ४२ हजार गाठींवर होती. तर बाजारभाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. बाजारामध्ये चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Agrowon Podcast : टोमॅटोचा बाजार दबावातच; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच काय आहेत हरभरा दर ?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनचे वायदे १२.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयातेल ४५.८२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तसेच सोयापेंडचा भाव ३७८ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशातील बाजारात मात्र रोज ५० रुपयांपर्यंतचे चढ उतार दिसत आहेत. सरासरी दरपातळी मात्र ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनच्या भावातील चढ उतार आणखी काही दिवस दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोचा बाजार मागील काही आठवड्यांपासून दबावातच आहेत. लागवडी एकाच वेळी तोडणीला आल्या आणि बाजारात आवक वाढत असल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचा भाव काही बाजारांमध्ये अगदी ५०० रुपये प्रतिक्विंटलपासून सुरु होत आहे.

तर देशातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी ९०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Chana Market Rate : हरभऱ्यातील तेजी किती दिवस टिकेल ? हरभऱ्याचा भाव कोणत्या कारणांनी कमी होऊ शकतात?

देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून उडदाचे भाव टिकून आहेत. उडदाची बाजाराील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. सरकारने उडदाचे भाव कमी कऱण्यासाठी अनके निर्णय घेतला.

पण तरीही सरकारला अपेक्षेप्रमाणे भाव पाडता आले नाहीत. सध्या उडदाचा भाव ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. उडदाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील गव्हाचे उत्पादन यंदाही सलग दुसऱ्यावर्षी कमी झाले. तसेच सरकारकडील गव्हाचा स्टाॅक कमी आहे. बाजारातील भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सरकारच्या गव्हाची खरेदी कमी झाली. बाजारातील आवकही कमी झाली आहे.

त्यामुळे गव्हाचे भाव २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. गव्हाचे भाव यापुढील काळातही कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com