Turmeric Market
Turmeric Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Turmeric Market : हळदीचे दर जास्त पुरवठा आणि कमी मागणीमुळं दबावात

Anil Jadhao 

१) कापूस बाजार स्थिरावला (Cotton Rate)

देशातील बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) टिकून आहेत. मात्र वाद्यांमध्ये देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही नरमाई दिसून आली. देशातील वायदे आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी ४६० रुपयांनी कमी होऊन ६३ हजार ४६० रुपयांवर बंद झाले.

तर आयसीईवरील वायदे ८०.३८ सेंटवर बंद झाले. बाजार समित्यांमधील दरपातळी मात्र ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांवर कायम होती. कापसाची ही दरपातळी आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील (Cotton market) अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) सोयाबीनचे दर कायम (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे टिकून आहेत. शुक्रवारी सोयाबीन १५.२७ डाॅलरवर होते तर सोयापेंडचे वायदे ४९० डाॅलर प्रतिटनावर बंद झाले. देशात सोयाबीनचा बाजार आजही स्थिर होता.

सोयाबीनला बाजारामध्ये सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. देशातून सोयापेंड निर्यात वाढली. तसचं सरकार खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढविण्याचा अंदाज आहे. त्यामुळं सोयाबीन दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) कारल्याची आवक घटली

राज्यातील बाजारात सध्या कारल्याचे दर तेजीत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर बाजार वगळता इतर बाजारातील आवक सरासरी १० ते २० क्विंटलच्या दरम्यान आहेत. तर कारल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कारल्याचे दर तेजीत आहेत.

कारल्याला सध्या २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. कारल्याचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) गाजराचे बाजारभाव तेजीत

गाजराला सध्या चांगला उठाव आहे. मात्र बाजारातील आवक कमी आहे. गाजराची आवक सरासरी १० क्विंटलच्या दरम्यान आहे. तर मोठ्या बाजारांमधील आवक जास्त आहे. पण सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे गाजराचे दर तेजीत आहेत.

सध्या गाजराला १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काही दिवसांमध्ये गाजराची आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गाजराचे दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापीर व्यक्त करत आहेत.

५) सध्या हळदीला काय दर मिळतोय?

देशात मागील हंगामात १३ लाख २९ हजार टन हळद उत्पादन झाले. त्यापैकी तब्बल २ लाख टन माल शिल्लक आहे. तर यंदा १३ लाख १४ हजार टन उत्पादनाचा अंदाज आहे. या शिल्लक साठ्यामुळे यंदा पुरवठा जास्त वाढला.

काही भागात पावसाचा फटका बसला पण उत्पादनात मोठी घट येईल अशी स्थिती नाही, असं व्यापारी सांगत आहेत. यंदा हळदीची उपलब्धता वाढल्याने दर दबावात आहेत. मागील महिनाभराचा विचार करता दरात क्विंटलमागं ७०० रुपयांपर्यंत नरमाई आली.

सध्या हळदीला गुणवत्तेप्रमाणं ५ हजार ते ७ हजार रुपयांपर्यतं दर मिळाला. बाजारात हळद आवकेचा दबाव पुढील काळात वाढू शकतो. सध्या हळदीचे दर कमी झाल्यामुळं दुसरीकडे उठाव वाढण्याचा अंदाज आहे. यंदा रमजान लवकर आल्याने त्याचीही मागणी येत आहे.

निर्यातही वाढत आहे. मागील १५ दिवसांमध्ये देशातून ६० ते ७० कंटेनर्सची निर्यात झाली. तसंच या घटलेल्या दरात जुन्या मालाचा साठाही होत आहे. त्यामुळं सध्याच्या दरात फार घट होईल, असं वाटत नाही.

हळदीचे दर आवक वाढल्यानंतर ५ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story : वळवाचा पाऊस...

Turmeric Cultivation : हळद लागवडीची पूर्वतयारी

Finland Banking System : फिनलँडमधील सक्षम सहकारी बँकिंग व्यवस्था

Agriculture Success Story : माळरानाचे पालटले चित्र...

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनास हवामान अनुकूल

SCROLL FOR NEXT