
Turmeric Crop Planning, Management : नांदेड जिल्ह्यातील जानापुरी (ता. लोहा) येथे चंपतराव जळबाजी कदम यांची एकत्रित कुटुंबाची ८० एकर जमीन आहे. त्यात ५ एकरांवर हळद लागवड, तर उर्वरित क्षेत्रावर हरभरा २० एकर, भुईमूग १ एकर, रब्बी ज्वारी १० एकर, तूर ५ एकर आणि सोयाबीन लागवड ३० एकरांवर आहे.
चंपतराव हे २००३ पासून हळद उत्पादन (Turmeric production) घेत आहेत. त्यांचे वडील जळबाजी कदम हे पारंपरिक पद्धतीने हळद लागवड करायचे. त्यात बदल करत चंपतराव यांनी २०१५ पासून बेडवर हळदीची लागवड करण्यास सुरुवात केली.
शेतकरी ः चंपतराव जळबाजी कदम
गाव ः जानापुरी, ता. लोहा, जि. नांदेड
एकूण क्षेत्र ः ८० एकर
हळद लागवड ः ५ एकर
लागवड नियोजन ः
१) या वर्षी ५ एकर क्षेत्रावर हळद लागवडीचे (Turmeric Cultivation) नियोजन केले आहे. त्यानुसार लागवडीपूर्वी ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची खोल नांगरट करून घेतली.
२) एकर २ ट्रॉली याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत शेतामध्ये पसरून घेतले.
३) लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने साडेचार फूट अंतराचे बेड तयार केले.
४) बेडवर दोन ओळींत १५ इंच, तर दोन बेण्यांत ९ इंच अंतर राखत बेणे लागवड केली. साधारणपणे २४ ते ३० जून दरम्यान लागवड पूर्ण केली.
५) लागवडीपूर्वी बेण्यास रासायनिक बेणे प्रक्रिया करून घेतली.
६) पाच एकर क्षेत्रावर लागवडीसाठी सेलम जातीचे एकरी ८ क्विंटल बेणे लागले. त्यांच्या अनुभवानुसार दरवर्षी एकरी ३० ते ३५ क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.