Turmeric Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हळदीच्या बाजारातील सुधारणा कायम

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ९४.१३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्येही चढ उतार होत दुपारपर्यंत वायदे ६३ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर होते.

कापूस आवकेचा विचार केला तर काल देशातील बाजारात कपसाची आवक वाढली होती. तर बाजार समित्यांमधील भावपातळीतही काही प्रमाणात चढ उतार राहीले. पण सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. आणखी काही दिवस बाजारात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरातही चढ उतार सुरु आहेत. सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव वाढलेल्या पातळीवर टिकताना दिसत नाहीत. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत पुन्हा ११.८९ डाॅलर प्रतिपाऊंडवर आले होते.

तर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम होते. सोयापेंडचा भावही स्थिर होता. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस पाहायला मिळू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हळद दरातील सुधारणा कायम आहे. यंदा हळद उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर सध्या बाजारातील आवकही मर्यादीत आहे. याचा आधार हळद बाजाराला मिळत आहे. हळदीचा सरासरी भाव सध्या १३ हजार ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. तर वायद्यांमध्ये हळदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत.

एनसीडीईएक्सवर हळद आज १८ हजार ७०० रुपयांवर होती. हळद बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता दराला चांगला आधार आहे. पण आवकेच्या हंगामात चढ उतारही दिसून येतील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या बाजारात मागील तीन दिवसांपासून चढ उतार दिसून येत आहेत. कांदा भावात १०० ते २०० रुपयांचे चढ उतार दिसत आहेत. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांदा भाव दोन दिवसांपासून पुन्हा कमी झाले आहेत. कांद्याचा आजचा सरासरी भाव १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान होता.

तर दोन दिवसांपुर्वी हाच भाव १४०० ते १७०० रुपये होता. सरकारची पकड असल्याने कांदा उत्पादकांना मात्र तोटा सहन करावा लागत आहे. कांद्याची भावपातळी आणखी काही आठवडे या दरम्यान दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीच्या बाजारातील भावपातळी कायम आहे.  तुरीचे भाव ऐन आवकेच्या हंगामातही टिकून आहे. दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे. सरकार आयात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येत आहे.  

परिणामी तुरीची सरासरी भावपातळी ९ हजार ५०० ते १० हजार रुपयांच्या दरम्यान टिकून आहे. यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे. यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT